नाशिक : मालेगाव तालुक्यात मंगळवारी दिवसभरात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे या वर्षभरात तालुक्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या १९ झाली आहे.गणेश बच्छाव (३३) यांनी शेतातील घराजवळ गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यावर ४५ हजार रुपये कर्ज होते. पाडळदे येथे महेश सोनवणे (३३) पिंपळे शिवारात मृतावस्थेत आढळले. त्यांनी विषारी औषध सेवन केले होते. प्रवीण मगर यांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. (वार्ताहर)
नाशिकमध्ये तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या
By admin | Updated: December 2, 2015 01:30 IST