शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात तीन शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: March 29, 2016 02:34 IST

कर्जबाजारीपणाला कंटाळून तेल्हारा आणि बाश्रीटाकळी तालुक्यातील शेतक-यांची आत्महत्या.

अकोला : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून तेल्हारा तालुक्यातील २ आणि बाश्रीटाकळी तालुक्यातील एक, अशा तीन शेतकरी आत्महत्येच्या घटना सोमवारी उघडकीस आल्या.तेल्हारा तालुक्यातील भांबेरी येथील अशोक हरिभाऊ सरोदे (५४) यांनी सोमवारी सकाळी स्वत:च्या शेतातील कडुनिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या नावे साडेतीन एकर शेती असून, मुलगा धीरज याच्या नावे अडीच एकर शेत आहे. गत दोन-तीन वर्षांपासून त्यांना नापिकीचा सामना करावा लागला. त्यामुळे कर्जाचा डोंगर वाढला. अशातच या वर्षीही पीक झाले नाही. त्यामुळे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत सरोदे यांनी जीवनयात्रा संपविली. त्यांच्या मुलावरही बँकेचे दीड लाख रुपयांचे कर्ज आहे. याच तालुक्यातील हिंगणी खुर्द येथील एका तरुण शेतकर्‍याने सोमवारी गावालगतच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. अंबादास बाबूसिंग सोळंके (२७ ) हे मृताचे नाव आहे. त्यांच्या वडिलांच्या नावे तीन एकर शेती असून, अंबादास यांच्या पत्नीचे निधन तीन महिन्यांपूर्वीच झाले होते. शेतकरी आत्महत्येची तिसरी घटना बाश्रीटाकळी तालुक्यातील पार्डी येथे घडली. येथील माणिक प्रल्हाद काकड या शेतकर्‍याने हलाखीच्या परिस्थितीला कंटाळून स्वत:ला जाळून घेतले. त्यांच्याकडे चार एकर शेती असून, त्यावर ४0 हजार रुपयांचे कर्ज आहे. २६ मार्च रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास त्यांनी अंगावर रॉकेल घेऊन, पेटवून घेतले होते. अकोला येथील सवरेपचार रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. २७ मार्च रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.