शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

विदर्भातल्या तीन जिल्हा बँका तरणार

By admin | Updated: June 14, 2017 01:51 IST

सरकारने परवा घोषित केलेल्या ‘सरसकट’ कर्जमाफीने विदर्भातील नागपूर, बुलडाणा व वर्धा या तीन जिल्हा बँका दिवाळखोर होण्यापासून वाचणार आहेत.

- सोपान पांढरीपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सरकारने परवा घोषित केलेल्या ‘सरसकट’ कर्जमाफीने विदर्भातील नागपूर, बुलडाणा व वर्धा या तीन जिल्हा बँका दिवाळखोर होण्यापासून वाचणार आहेत.या तीनही बँका सध्या प्रशासकाच्या नियंत्रणाखाली असून कर्जमाफी झाली अथवा सरकारने ‘पॅकेज’ दिले तरच त्या तरतील असे भाकित ‘लोकमत’ने ११ मार्च २०१७ रोजी केले होते ते आता खरे ठरले आहे. या कर्जमाफीचा सर्वाधिक फायदा राज्यातील सर्वात जुन्या नागपूर जिल्हा बँकेला होणार आहे.नागपूर जिल्हा बँकेजवळ ३१ मार्च २०१७ रोजी ८४२ कोटींच्या ठेवी होत्या व कर्जवाटप ६६१ कोटी होते, त्यापैकी ४७८ कोटी कृषीकर्ज होते. बँकेचा संचित तोटा २१६ कोटी होता. कर्जमाफी पोटी बँकेला ४७८ कोटी मिळतील व संपूर्ण तोटा संपुष्टात येऊन बँकेजवळ २६२ कोटी अतिरिक्त निधी राहील व बँक आर्थिकदृष्ट्या मजबूत होईल. ‘‘कर्जमाफीमुळे आम्ही संकटातून बाहेर पडून एक सक्षम बँक बनू’’ असे बँकेचे मुख्याधिकारी संजय कदम म्हणाले.बुलडाणा जिल्हा बँकेजवळ ५१९ कोटी ठेवी होत्या व ५२२ कोटी कर्जवाटप होते त्यापैकी ३९२ कोटी कृषी कर्ज होते. बँकेचा संचित तोटा २४७ कोटी होता. त्यामुळे बँकेला ३९२ कोटी कर्जमाफीतून मिळतील व बँकेला १५५ कोटी खेळते भांडवल मिळेल. ‘‘कर्जमाफी ही आमच्या बँकेसाठी अचानक मिळालेले वरदान आहे.’’ असे मुख्याधिकारी डॉ. अशोक खरात म्हणाले.वर्धा जिल्हा बँकेची स्थिती जरा वेगळी आहे. बँकेजवळ ३६५ कोटी ठेवी आहेत व कर्जवाटप ३१८ कोटी व कृषीकर्ज २४३ कोटी आहे. बँकेचा संचित तोटा २८० कोटी आहे. त्यामुळे बँकेला २४३ कोटी मिळाले तरी ३७ कोटी तोटा कायम राहील. ‘‘सरकारने आम्हाला आर्थिक मदत द्यावी व सक्षम जिल्हा बँक बनवावे’’ अशी अपेक्षा मुख्याधिकारी अरुण कदम यांनी व्यक्त केली.तक्ता (रु. कोटीत)नावठेवीएकूण कर्जकृषी कर्जसंचित तोटाबुलढाणा जिल्हा बँक ५१९.०९५२२.९१३९२.७८२४७.७०वर्धा जिल्हा बँक३६५.५६३१८.६५२४३.०९२८०.८५नागपूर जिल्हा बँक८४२.२२६६१.०४४७८.९७२१६.१०