शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

मराठवाड्यात जूनमध्ये तिघांचे बळी; मारहाणीच्या तब्बल ३० घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 02:03 IST

मुले पळविणारे समजून औरंगाबाद जिल्ह्यात १५ जून रोजी पडेगाव येथे बेदम मारहाण झालेल्या दोन बहुरुप्यांपैकी एकाचा २८ जून रोजी घाटी रुग्णालयात मृत्यू झाला.

औरंगाबाद : मराठवाड्यात मुले पळविणारी टोळी आल्याच्या अफवांचे महिनाभरापासून व्हॉटस् अपच्या माध्यमातून पीकच आले आहे. मुले पळविणारे समजून औरंगाबाद जिल्ह्यात १५ जून रोजी पडेगाव येथे बेदम मारहाण झालेल्या दोन बहुरुप्यांपैकी एकाचा २८ जून रोजी घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यापूर्वी जून महिन्यातच वैजापूर येथे झालेल्या मारहाणीत दोघांचा मृत्यू झाला. जमावाविरुद्ध केवळ गुन्हा दाखल झाला. कोणालाही अटक झालेली नाही. नांदेड, परभणी, जालना, बीड, हिंगोली, लातूर येथेही मुले पळविणारे समजून मारहाणीच्या ३० घटना घडल्या.

औरंगाबादला तिघांचा मृत्यूमुले पळविणारे समजून १५ जून रोजी पडेगाव परिसरातील कासंबरी दर्गा परिसरात बेदम मारहाण झालेल्या दोन बहुरुप्यांपैकी एकाचा २८ जून रात्री घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. चोर आल्याच्या अफवेचा औरंगाबाद जिल्ह्यातील हा तिसरा बळी ठरला.नांदेडला भंगार विक्रेत्यांना चोपलेदोन ठिकाणी पाच भंगार विक्रेत्यांना मारहाण झाली. भोकर येथे बाजारात एका महिलेला, तर मुदखेड येथेही एकाला मारहाण झाली होती.परभणीत मनोरुग्णाला मारलेमनोरूग्णासह पाच जणांना, सोनपेठ येथे एकाला, गंगाखेड येथे दोघांना आणि पाथरी येथे तिघांना मुले पळविणारे समजून मारहाण झाली. जिल्ह्यात आतापर्यंत ११ जणांना मारहाण झाली आहे.जालन्यातही घटनामंठा येथे चार जणांना बेदम मारहाण झाली. त्यात दोन महिला आणि दोन तरूण गंभीर जखमी झाले.बीडमध्ये गुन्हे दाखलमाजलगावात दोन, गेवराईत दोन आणि बीड, परळीत प्रत्येकी एकाला मारहाण झाली. माजलगावमध्ये १० ते १२ जणांविरूद्ध तर व्हॉटस्अ‍ॅपवर अफवा पसरविणाऱ्या एका तरूणावर गुन्हा दाखल आहे.लातूरला रिक्षा जाळलीनिलंगा येथून ८ जून रोजी आॅटो चालक तानाजी सोनवणे यांना होसूर येथे काही तरुणांनी जबर मारहाण करीत रिक्षा पेटवून दिली.हिंगोलीतही प्रकारमुले पळविणारे समजून शहरात दोघांना मारहाण झाली. हे प्रकरण पोलीस ठाण्यात जाण्याआधीच मिटविण्यात आले. कोथळज येथे एकाला मारहाण झाली.शहाद्यात जाळली होती चारचाकीम्हसावद (ता़ शहादा, नंदुरबार) येथे नंदकुमार बाळोबा डोंबे, सचिन गुरलिंग तवटे, रामा विठ्ठल शिंदे (तिघे रा़ पंढरपूर) यांना मुले पळवणारे समजून २८ जून रोजी रात्री मारहाण झाली होती़ जमावाने त्यांचे चारचाकी वाहन पोलीस ठाण्याच्या आवारातच जाळून टाकले. एसआरपीएफ जवान आणि पोलीस कर्मचाºयांवर दगडफेक केली. म्हसावद पोलीस ठाण्यात तब्बल २५० लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.मृत नाथपंथी डवरी समाजाचे : मंगळवेढा (जि. सोलापूर): धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात मुले पळविणारी टोळी म्हणून ठार मारण्यात आलेल्यांची ओळख पटली असून, यातील चौघे मंगळवेढा तालुक्यातील आहेत. पोटासाठी वणवण फिरणे हे युवकांना महागात पडले. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात नाथपंथी डवरी समाज मोठ्या संख्येने राहतो. मंगळवेढा तालुक्यात २० गावांमधून १५ ते १६ हजार नाथपंथी डवरी, गोसावी समाजाचे लोक राहतात. या समाजाची पहिली पिढी अद्यापही भिक्षा मागून खाते. दुसºया पिढीला शिक्षणाची थोडीफार ओळख आहे.साधूंना मारहाणघोटाणे (ता. नंदुरबार) येथे २९ जून रोजी सकाळी जळगाव व जालना जिल्ह्यातील पाच साधू गावात भिक्षा मागत होते. त्याचवेळी गावातून पाच वर्षीय बालिका बेपत्ता झाल्याची अफवा पसरली़ संशयातून ग्रामस्थांनी साधूंना बेदम मारहाण केली. चौकशीनंतर पोलिसांनी त्यांना सोडून दिले.ब्राह्मणपुरीत बहुरूपीवर संशयब्राह्मणपुरी (ता. शहादा) येथे लोकांचे मनोरंजन करणाºया बहुरूपीवर २९ जून रोजी संशय घेण्यात आला. त्याची चौकशी केल्यानंतर ओळख पटली.अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील मढी येथील नागरिकांनी संशयातून बुधवारी केलेल्या मारहाणीत जबर जखमी झालेल्या नाशिकच्या राजेश कैलास यंदे याचा शनिवारी दुपारी करंजी येथे मृत्यू झाला़राजेश यंदे यांचे वडील कैलास यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा मुलगा बुधवारी मढी येथे गेला होता़ घटनेची चौकशी करण्याची मागणीही कैलास शिंदे यांनी केली आहे़मालेगाव (नाशिक) शहरातील भागात मुले पळवणारी टोळी समजून परभणी जिल्ह्यातील गजानन साहेबराव गिरे व सिंधुताई साहेबराव गिरे या दोघांना जबर मारहाण करण्यात आली. त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.