राज्यात दरदिवशी तीन लाचखोर जाळ्यात

By admin | Published: October 12, 2016 06:23 AM2016-10-12T06:23:01+5:302016-10-12T06:23:01+5:30

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यक्षम कारभारामुळे राज्यात दरदिवशी तीन लाचखोरांवर कारवाई होत आहे. जानेवारी ते आॅक्टोबर या ९ महिन्यात तब्बल ७८१ लाचखोरांना रंगेहाथ पकडले

Three bribe looters in the state every day | राज्यात दरदिवशी तीन लाचखोर जाळ्यात

राज्यात दरदिवशी तीन लाचखोर जाळ्यात

Next

आप्पासाहेब पाटील / सोलापूर
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यक्षम कारभारामुळे राज्यात दरदिवशी तीन लाचखोरांवर कारवाई होत आहे. जानेवारी ते आॅक्टोबर या ९ महिन्यात तब्बल ७८१ लाचखोरांना रंगेहाथ पकडले. तर अपसंपदाच्या ११ तर अन्य भ्रष्टाचाराचे ११ इतर गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल केले आहेत़
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) वरिष्ठांनी राज्यातील एसीबीच्या सर्वच अधिकाऱ्यांना नागरिकांकडून आलेल्या प्रत्येक तक्रारीवर निर्णय घेणे सक्तीचे केले. एसीबीच्या कारवाईसाठी जनतेचा प्रतिसाद महत्त्वाचा आहे, हे ओळखून टोल फी क्रमांक, आॅनलाइन तक्रारी घेणे सुरू केले आहे (प्रतिनिधी)
राज्यात चालू वर्षात आतापर्यंत ७८१ लाचखोर जाळ्यात सापडले. यात सर्वाधिक १४९ कारवाया पुणे विभागात झाल्या. त्या खालोखाल नाशिक ११५, नागपूर १११, औरंगाबाद १०४, नांदेड ८७, अमरावती ८८, ठाणे ९२ आणि मुंबईत ५७ लाचखोरांना पकडण्यात आले. महसूल व पोलीस विभाग टॉपवर
राज्यात एसीबीने जानेवारी ते आॅक्टोबर या कालावधीत सापळा, अपसंपदा व अन्य भ्रष्टाचाराच्या कारवाईत तब्बल ७८१ जणांना पकडले़ यात सर्वाधिक लाचखोर म्हणजेच २२२ हे पोलीस विभाग तर २२० हे महसूल विभागातील आहेत़ याशिवाय पंचायत समिती ९९, म़रा़वि़मं़ ५६, महानगरपालिका ४९, शिक्षण विभागात ६३ कारवायांत लाचखोरांना पकडण्यात आले.
१ कोटी ७४ लाखांची मालमत्ता जप्त
सापळा कारवाईदरम्यान एसीबीच्या पथकाने राज्यातील ९९१ आरोपींकडून १ कोटी ७४ लाख १९ हजार २२३ रुपयांची मालमत्ता हस्तगत केली आहे़ याशिवाय पोलीस विभागाची २२ लाख ७० हजार ५४५, महसूल विभागाची १८ लाख ३५ हजार ९२८ एवढी मालमत्ता जप्त केली आहे़

Web Title: Three bribe looters in the state every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.