अलिबाग : जमीन खरेदी करण्याच्या हेतूने ४० लाख घेऊन अलिबागला आलेल्या घाटकोपरमधील धनिकाचे अपहरण करून रोख रक्कम लंपास केली. २६ डिसेंबर, २०१६ रोजी घडलेल्या या घटनेप्र्रकरणी सहा जणांवर दरोडा आणि अपहरणासह खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सहा जणांपैकी तिघांना तत्काळ अटक करण्यात आले. यातील तिघे रायगड पोलीस मुख्यालयात पोलीस कॉन्स्टेबल आहेत. प्रशांत कांबळे, रवी राठोड व किशोर खाडे ही त्यांची नावे आहेत. त्यांना शुक्रवारी जिल्हा न्यायालयात हजर केले असता, १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. अद्याप फरार असलेल्या तिघांमध्येही दोन पोलीस कॉन्स्टेबल व अन्य एकाचा समावेश आहे. याप्रकरणी त्या धनिकानेच अलिबाग पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल केला. (विशेष प्रतिनिधी)
धनिकाचे अपहरण करणाऱ्या तिघांना अटक
By admin | Updated: January 7, 2017 05:39 IST