नवी मुंबई/ वज्रेश्वरी : ऐरोलीचे तिघे चिरांबा (अंबाडी) येथे सहलीला गेले असता शनिवारी नदीत वाहून गेले. रात्री उशिरापर्यंत नदीकिनारी त्यांचा शोध घेण्यात आला.ऐरोली गावातील ८ ते १० जण वाडा येथील अंबाडी नदीकिनारी सहलीसाठी गेले होते. सहा जण नदीच्या पात्रात उतरले. त्याचदरम्यान पावसामुळे धरण भरत आल्यामुळे धरणाचा दरवाजा उघडण्यात आला. तिघेजण वाहून गेले. बबन मढवी (४५), देविदास पाटील (३८) व विलास जोशी (४२) अशी त्यांची नावे आहेत. रवी मढवी, राजा कोटकर, परशुराम म्हात्रे बचावले. बबन यांचे फार्महाऊस चिरांबा येथे आहे. हे सर्व मित्र अधूनमधून येथे येत असतात. तिघेही ऐरोली गावचे राहणारे आहेत. त्यांच्या वाहून जाण्याची माहिती मिळताच ऐरोलीतील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांच्याकडून रात्री उशिरापर्यंत वाहून गेलेल्यांना शोधण्याचे काम सुरू होते. (प्रतिनिधी)
ऐरोलीचे तिघे नदीत वाहून गेले
By admin | Updated: August 1, 2016 04:31 IST