मुंबई : इस्रायलींकडून पॅलिस्टिनींचा छळ करण्यात येत असल्याने मुंबई पोलिसांना हल्याबाबत धमकावणारे निनावी पत्र मिळाले आहे. १९९३च्या बॉम्बस्फोटावेळी नशीबवान असल्याने वाचला, हिंमत असल्यास आम्हाला आता थांबवून दाखवा, असे आव्हान या पत्रातून देण्यात आले आहे. खोडसाळपणाने कोणीतरी हे कृत्य केल्याची शंका वर्तविण्यात आली असली, तरी योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना अधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तालयातील तक्रार कक्षामध्ये दोन दिवसांपूर्वी एक निनावी पत्र मिळाले आहे. आयुक्त राकेश मारिया यांना उद्देशून एका पानावर इंग्रजीमध्ये मजकूर लिहिला आहे. आता खूप झाले, गाझामध्ये अत्याचाराने परिसीमा गाठली आहे. त्यामुळे क्रांतीची गरज आहे. १९९३च्या वेळी तुम्ही नशिबाने वाचला, पण आता नाही वाचणार. हिंमत असल्यास आम्हाला अडवून दाखवा, असे धमकावले आहे. पत्रातील काही मजकूर हा हिंदीत लिहिण्यात आला आला आहे. एखाद्या स्थानिकाकडून खोडसाळपणे हे कृत्य केल्याची शक्यता वर्तविली आहे. (प्रतिनिधी)
मुंबई पोलिसांना धमकीचे पत्र
By admin | Updated: July 28, 2014 04:19 IST