शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शेगाव, शिर्डी मंदीर उडविण्याची इसिसची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2016 17:31 IST

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर इसिसने शेगाव तसेच शिर्डी येथील मंदीरे बॉम्बने उडविण्याची धमकी दिली

लोकमत एक्सक्लुसिव्हश्यामकांत सहस्त्रभोजने

अमरावती, दि. ६ -  स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर 'इस्लामिक स्टेट आॅफ इराक अ‍ॅन्ड सिरीया' (इसिस) या दहशतवादी संघटनेने अमरावती, मलकापूर, भुसावळ व जळगाव या चार प्रमुख रेल्वे स्थानकांसह शेगाव, शिर्डी येथील मंदीरे आणि शेगावचे न्यायालय बॉम्बस्फोटाने उडविण्याची धमकी दिली आहे. सदर पत्र जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहे. राज्य गुप्तवार्ता विभागाने राज्यभर अलर्ट जारी केला आहे. 'हिंदुस्थान मुर्दाबाद, पाकिस्तान जिंदाबाद' अशा घोषणेचे पत्र जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना ५ आॅगस्ट रोजी प्राप्त झाले. अजमल कसाब हा चांगला माणूस होता, असा उल्लेखही या पत्रात आहे. इसिस संघटनने हे पत्र पाठविल्याचा उल्लेख असल्यामुळे राज्यातील सुरक्षा यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे. जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य गुप्तवार्ता विभागाला ही माहिती दिल्यानंतर सर्व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना व सुरक्षा यंत्रणांना अलर्ट करण्यात आले आहे. रेल्वे स्थानकांची कसून चौकशीरेल्वे स्थानकांंची कसून तपासणी सरू करण्यात आली आहे. संशयास्पद व्यक्तींवर करडी नजर ठेवली जात आहे. शस्त्रांस्त्रांनी सज्ज असलेले पोलीस गणेवशात आणि नजरबाज पोलीस खासगी वेशात तैनात करण्यात आले आहेत. भुसावळ अंतर्गत असलेल्या मध्य रेल्वेच्या अकोला रेल्वे सुरक्षा बळाच्या बॉम्ब शोधक नाशक पथकाकडून शनिवारी सायंकाळी अमरावती रेल्वे स्थानकाची कसून तपासणी करण्यात आली. अमरावती शहर पोलीस दलाच्या कोतवाली पोलीसांनीही अमरावती रेल्वेस्थानकाची बारकाईने तपासणी केली. इसिसने पाठविलेल्या धमकीपत्रात औरंगाबाद, परभणी, अकोला, खामगाव येथील कार्यकर्ते याकामी नेमले असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. रेल्वे स्थानक व देवस्थान उडविण्याची धमकी देणाऱ्या इसिस कार्यकर्त्याकडे अ‍ेके-४७, बुलेटप्रुफ जॅकेट, जिवंत काडतुस असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. मोदी, फडणवीस, हजारे, तोगडीयाही टार्गेटइसिस संघटनेने जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे, विश्व हिंदु परिषदेचे प्रमुख प्रवीण तोगडिया यांनाही ठार मारण्याची धमकी दिली आहे. त्या अनुषंगाने सुरक्षा यंत्रणेला सज्ज राहण्याच्या सूचना राज्य गुप्तवार्ता विभागाने दिल्या आहेत.बॉक्सअमरावती रेल्वे स्थानक बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी अमरावती रेल्वे स्थानकाची कसून तपासणी करण्यात आली. संशयास्पद व्यक्तींवर करडी नजर असून लगेचच स्कॅनरमधून सामानाची तपासणी केली जात आहे.सी.एस.पटेलनिरीक्षक, रेल्वे सुरक्षा बल, बडनेरा