शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
5
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
6
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
7
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
8
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
9
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
10
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
11
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
12
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
13
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
14
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
15
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
16
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
17
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
18
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
19
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू

मोदी सरकारमुळे सहिष्णुतेला धोका

By admin | Updated: July 27, 2014 01:43 IST

खोटी आश्वासने, भूलथापा देऊन केंद्रात सत्तेवर आलेल्या मोदी सरकारचे पहिल्या 50 दिवसांतच खरे स्वरूप समोर आले.

औरंगाबाद : खोटी आश्वासने, भूलथापा देऊन केंद्रात सत्तेवर आलेल्या मोदी सरकारचे पहिल्या 50 दिवसांतच खरे स्वरूप समोर आले. या सरकारमुळे देशातील बंधुभाव, सहिष्णुतेला धोका निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील सुज्ञ जनता राज्यात त्यांना थारा देणार नाही, असा हल्लाबोल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी मोदी सरकारवर केला. 
काँग्रेसच्या मराठवाडा विभागीय संकल्प मेळाव्यात मुख्यमंत्री चव्हाण बोलत होते. प्रदेशाध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे अध्यक्षस्थानी होते. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील- निलंगेकर, पालकमंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, परिवहनमंत्री मधुकरराव चव्हाण, राज्यमंत्री डी. पी. सावंत, दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री अब्दुल सत्तार, राज्यमंत्री अमित देशमुख, युवक काँग्रेसचे अध्यक्ष खा. राजीव सातव, खा. रजनी पाटील, महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा कमल व्यवहारे यांची या वेळी मंचावर प्रमुख उपस्थिती होती. 
मुख्यमंत्री म्हणाले, की लोकसभेचा निकाल अनपेक्षित होता. आम्ही परंपरागतपणो लढलो व त्यांनी उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून आमच्याविरुद्ध नकारात्मक प्रचार केला. परंतु पहिल्या 5क् दिवसांत लोकांना चूक उमगली आहे. ‘अच्छे दिन आनेवाले हैं’ म्हणत सत्तेवर आलेल्या सरकारने सर्वच क्षेत्रंत महागाई करून जनतेला फसविले आहे. देशाचे विघटन करणा:या प्रवृत्तीला वेळीच रोखा, असे आवाहन  मोहन प्रकाश यांनी केले. सत्तेवर येताच 1क्क् दिवसांत महागाई कमी करू, असे आश्वासन देऊन मतदारांना भूलथापा देणा:या मोदी सरकारने प्रचारात देशी-विदेशी कंपन्या व उद्योगपतींना उतरविले होते, असा आरोप प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांनी केला.
 लोकसभेच्या वेळची लाट आता  ओसरेल, असा विश्वास महसूलमंत्री थोरात यांनी व्यक्त केला, तर कारगील विजयी दिनानिमित्त कारगील शहिदांना अभिवादन करून शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा म्हणाले, 574 सैनिकांनी आपल्या प्राणांची बाजी लावून हा विजय आम्हाला मिळवून दिला. देशाची एकात्मता, बंधुभाव टिकणार की नाही, सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र राहणार की नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. 
या वेळी परिवहन मंत्री मधुकर चव्हाण, दुग्ध, पशुसंवर्धन मंत्री अब्दुल सत्तार, राज्यमंत्री डी. पी. सावंत, राज्यमंत्री अमित देशमुख यांचीही भाषणो झाली. (प्रतिनिधी)