शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला धमकी

By admin | Updated: February 12, 2017 02:21 IST

नामनिर्देशनपत्राबरोबर अनामत रक्कम न भरल्याने अर्ज बाद करण्यात आलेल्या उमेदवाराला सहकार्य केल्यास जीवे मारण्याची धमकी जी उत्तर प्रभागाच्या निवडणूक

मुंबई : नामनिर्देशनपत्राबरोबर अनामत रक्कम न भरल्याने अर्ज बाद करण्यात आलेल्या उमेदवाराला सहकार्य केल्यास जीवे मारण्याची धमकी जी उत्तर प्रभागाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला अज्ञात व्यक्तीकडून आली आहे. असा संदेश मोबाइलवर पाठविणाऱ्या व्यक्तीविरोधात दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक चौकशी सुरू आहे. अशा प्रकारे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला धमकावणे हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा मानला जातो. निवडणुकीसाठी २१ तारखेला मतदान होणार आहे. ३ फेब्रुवारी हा उमेदवारांचा अर्ज स्वीकारण्याचा शेवटचा दिवस होता. या तारखेला सायंकाळी ४.५९ वाजता प्रभाग क्र. १८८मधून एमआयएमचे उमेदवार दामगिद्दा पुष्पा बलराज यांनी अर्ज दाखल केला. मात्र निवडणूक कार्यालयाने या अर्जाची तपासणी केली असता त्यामध्ये अनामत रक्कम भरल्याच्या पावतीची प्रत जोडण्यात आली नसल्याने निदर्शनास आले. त्यानुसार ही पावती तत्काळ आणून देण्यास निवडणूक कार्यालयातून सदर उमेदवाराला कळविण्यात आले, मात्र अनामत रक्कम आपण भरलीच नसल्याने ती आता स्वीकारावी, अशी विनंती संबंधितांकडून करण्यात आली. अर्ज भरण्याची वेळ संपल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी माया पाटोळे यांनी तो स्वीकारला नाही. प्रभाग क्र. १८२ ते १९२च्या त्या निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. त्यांच्या निर्णयाविरोधात उमेदवाराने उच्च न्यायालयात केलेला दावाही बाद ठरला. परंतु पाटोळे यांना आज सकाळी पाच वाजून ३६ मिनिटांनी ७८९००५१३८० या क्रमांकावरून शिवीगाळ व धमकावणारा संदेश आला. यामध्ये एमआयएमच्या उमेदवाराला घाबरून त्यांना मदत केल्यास त्याचा अर्ज बाद करण्यासाठी जसे पैसे दिले तसे जास्त पैसे देऊन तुला ठार करू शकतो, अशी धमकी देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)- पाटोळे यांना आज सकाळी ५ वाजून ३६ मिनिटांनी शिवीगाळ व धमकावणारा संदेश आला. एमआयएमच्या उमेदवाराला घाबरून त्यांना मदत केल्यास त्याचा अर्ज बाद करण्यासाठी जसे पैसे दिले तसे जास्त पैसे देऊन तुला ठार करू शकतो, अशी धमकी देण्यात आली आहे.