शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

वरुणराजाचाही राजांना मुजरा! तिथीनुसारच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला हजारो शिवप्रेमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 06:16 IST

पारंपरिक वेशभूषेतील हजारो  शिवप्रेमींच्या उपस्थितीत ३४९ तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर रविवारी साजरा करण्यात आला.

महाड :

पारंपरिक वेशभूषेतील हजारो  शिवप्रेमींच्या उपस्थितीत ३४९ तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर रविवारी साजरा करण्यात आला. यावेळी तुतारींतून निघालेल्या ललकारी, ढोलताशांचा गजर आणि विविध धार्मिक विधी, पूजापाठ, वेद-मंत्रांच्या  घोषात वरूणराजानेदेखील हजेरी लावल्याने तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती, कोकणकडा मित्रमंडळ आणि रायगड जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी तिथीप्रमाणे  ३४९ वा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. पावसाळी वातावरणात हजारो शिवप्रेमींनी मोठ्या उत्साहात या सोहळ्याला हजेरी लावली होती. कार्यक्रमाची सुरुवात रायगडाची गडदेवता शिरकाई मातेच्या पूजनाने करण्यात आली. मेघडंबरी फुलांनी सजविली होती. पहाटे ध्वजारोहण सोहळा व श्री शिवप्रतिमा पूजन करण्यात आले. गडावरील विविध देवी-देवतांची विधीवत पूजा झाल्यानंतर धर्मशाळा ते राजदरबार अशी शिवरायांच्या मूर्तीची पालखी  काढली. खासदार श्रीरंग बारणे, श्रीकांत शिंदे, स्वागताध्यक्ष आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, सुनील पवार, सुरेश पवार उपस्थित होते.

मर्दानी खेळांचे केले सादरीकरण पावसाचा गारवा व दाट धुक्यातही शिवप्रेमींमधील अलोट उत्साह दिसत होता. राज्याभिषेकानंतर हलगी, ढोलताशे, लेझीम, मृदंगाच्या वाद्यात, शिवजयघोषात शिवप्रेमींच्या उत्साहात शिवाजी महाराजांची पालखी मिरवणूक राजसदरेहून होळीचा माळ, जगदीश्वर मंदिर अशी मार्गस्थ झाली. होळीच्या माळावर दांडपट्टे, लाठीकाठी, तलवारबाजीच्या मर्दानी खेळाबरोबरच लेझीमचेही सादरीकरण करण्यात आले.

टॅग्स :RaigadरायगडShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज