शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

२८६० कोटींचा विक्रीकर बुडवून हजारो व्यापारी बेपत्ता! - सुधीर मुनगंटीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 06:32 IST

राज्यातील हजारो व्यापा-यांनी विक्रीकर विभागाला हजारो कोटींचा चूना लावून पलायन केले आहे. ३१ मार्च २०१६ च्या आकडेवारीनुसार बेपत्ता व्यापा-यांकडे २८६०.१६ कोटींचा विक्रीकर थकित असल्याची माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत दिली.

मुंबई - राज्यातील हजारो व्यापा-यांनी विक्रीकर विभागाला हजारो कोटींचा चूना लावून पलायन केले आहे. ३१ मार्च २०१६ च्या आकडेवारीनुसार बेपत्ता व्यापा-यांकडे २८६०.१६ कोटींचा विक्रीकर थकित असल्याची माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत दिली.या बेपत्ता व्यापा-यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी आयकर विभागासह पोलिस, महसूल आणि नगरविकास विभागाची मदत घेतली जात असल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले. पीपल्स् रिपब्लिकन पक्षाचे जोगेंद्र कवाडे यांच्यासह शरद रणपिसे, संजय दत्त, भाई जगताप आदी काँग्रेस सदस्यांनी तारांकित प्रश्नाद्वारे व्यापा-यांकडील थकित विक्रीकराचा मुद्दा उपस्थित केला. बेपत्ता व्यापा-यांकडे २८६०.१६ कोटी इतके विक्रीकर थकित असल्याचे मुनगंटीवार यांनी लेखी उत्तरात सांगितले. बेपत्ता व्यापा-यांचा शोध घेण्यासाठी ज्या ठिकाणी व्यापा-यांचा व्यवसाय चालू होता, त्या जागेच्या बाबतीत तहसीलदार अथवा तलाठी यांचे अभिलेख, नगरपालिका, महानगरपालिका यांचा मालमत्ता विभाग तसेच सबरजिस्ट्रार यांचे अभिलेख इत्यादीकडे चौकशी करून व्यापा-यांचा ठावठिकाण व मालमत्ता शोधण्याचे आदेश देण्यात आल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. तसेच पोलिस स्टेशन, पोस्ट आॅफीस, कंपनी रजिस्ट्रार यांचे अभिलेख, इंटरनेट वरूनही व्यापा-यांचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. वसुली प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये व्यापा-यांची बँक खाती आणि मालमत्तेवर टाच आणण्यात येईल, असेही मंत्र्यांनी सांगितले.व्यापाºयांचा ठावठिकाणा सापडेनाकाही प्रकरणांमध्ये व्यापारी व्यवसायाचे ठिकाण सोडून गेल्यामुळे आणि त्यांचा नवीन व्यवसायाचा ठावठिकाणा सापडत नसल्यामुळे प्रलंबित थकबाकीची वसुली होण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. पाच लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या सर्व प्रकरणात प्राप्तिकर विभागाशी संपर्क साधून प्रलंबित थकबाकीच्या वसुलीसाठी व्यापा-याचे अद्ययावत बॅँक खाते आणि इतर तपशील मिळवण्यासाठी विक्रीकर विभाग प्रयत्न करत आहे, अशी माहिती त्यांनी दिली . बेपत्ता व्यापा-यांच्या बाबतीत संबंधित आस्थापना आणि तपास संस्थाकडे चौकशी करून बेपत्ता व्यापा-यांचा ठावठिकाणा शोधण्याचे आदेश विक्रीकर विभागाला दिल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारMaharashtraमहाराष्ट्र