जयंत धुळप,अलिबागकोकणवासीयांचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाच्या स्वागताकरिता आतूर झालेल्या मुंबई-ठाण्यातील चाकरमान्यांनी कोकणची वाट धरली आहे. राज्य परिवहन मंडळाने प्रतिवर्षी प्रमाणे कोकणात जाण्याकरिता विशेष आणि ज्यादा एसटी बसेसची व्यवस्था केली असून, दर तासाला जवळपास एक हजार गणेशभक्त एसटीतून कोकणात रवाना होतील. तर गुरुवारपर्यंत मुंबई, कल्याण, ठाण्यातून १८६९ एसटी बसेसमधून तब्बल १ लाख १२ हजार चाकरमानी कोकणात दाखल होणार आहेत. कोकणात जाण्यासाठी रविवारी ६ तर सोमवारी २५ आॅगस्टला रोजी ६६ बसेस रवाना झाल्या. अशाच प्रकारे मंगळवारी २६ आॅगस्टला ४०५, बुधवारी २७ आॅगस्ट रोजी सर्वाधिक १ हजार १४२ तर गुरुवारी २८ आॅगस्ट रोजी २५० अशा एकूण १ हजार ८६९ विशेष एसटी बसेस कोकणात रवाना होणार आहेत. अशाच प्रकारे मंगळवारी २६ आॅगस्टला ४०५, बुधवारी २७ आॅगस्ट रोजी सर्वाधिक १ हजार १४२ तर गुरुवारी २८ आॅगस्ट रोजी २५० अशा एकूण १ हजार ८६९ विशेष एसटी बसेस कोकणात रवाना होणार असल्याची माहिती रायगड एसटी विभागीय नियंत्रक ए. एस. गायकवाड यांनी दिली.
तासाला १,००० गणेशभक्तांचा प्रवास
By admin | Updated: August 26, 2014 03:58 IST