शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

हजारो शेतकऱ्यांच्या बांधावर दिवसाला आली ९ लाख युनिट सौरऊर्जा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2020 3:16 AM

११० प्रकल्प; मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना, चार हजार कोटींची गुंतवणूक

- सचिन लुंगसे मुंबई : भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयांतर्गत असलेल्या एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हिसेस लिमिटेडने मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजनेंतर्गत महावितरण, महानिर्मितीसोबत वीजखरेदी करार केले असून, याद्वारे राज्यातील ११० प्रकल्पांतून दिवसाला ९ लाख युनिट सौरऊर्जा मिळत आहे. ७० हजार शेतकऱ्यांना ती वापरता येत असून, याद्वारे १ लाख ९ हजार मेट्रिक टन कार्बन उत्सर्जन वाचत आहे. या प्रकल्पासाठी चार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.२०० आणि ३०० अशा ५०० मेगावॅटच्या वीज खरेदी करारानंतर पुन्हा महानिर्मितीसोबत २८० मेगावॅटचा करार करण्यात आला आहे. एकूण या योजनेंतर्गत ७८० मेगावॅट विजेचे करार होत आहेत.शेती पंपासाठी ज्या वाहिन्या वेगळ्या झाल्या. त्याद्वारे वाजवी वीजदरात कशी वीज देता येईल, हा याचा उद्देश आहे. महावितरणची जिथे उपकेंद्र आहेत, तेथील पडकी जमीन यासाठी वापरली जात आहे. छोटे प्रकल्प उभारण्यास सुरुवात झाली आहे. या प्रकल्पासाठी चार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.शेतकºयांना होणार फायदाउपकेंद्रालगत प्रकल्प उभारल्याने वीजहानी होत नाही. शेती पंपाचा फिडरदेखील येथेच जोडला जातो. त्यामुळे विजेची हानी कमी होत आहे.नुकतेच उस्मानाबाद जिल्ह्यातील शेलगाव आणि मुळुज येथे अनुक्रमे ५.२३, २.७ मेगावॅट क्षमतेचे दोन सौरऊर्जा प्रकल्प सुरू झाले. या गावासह लगतच्या ८ हजार शेतकºयांना फायदा होणार आहे. कारण एक सौरकृषी वाहिनी साधारण पाच ते दहा गावांतून जाते.कोरोनाच्या काळात ५० मेगावॅटच्या क्षमतेचे प्रकल्प सुरू झाले असून, या योजनेतून दीड हजार लोकांना रोजगार मिळाला.वीजहानी कमी होण्यास मदतसब स्टेशनच्या बाजूलाच सौरऊर्जा प्रकल्प लावल्यामुळे वीजहानी कमी होण्यास मदत होते. शेतकरी वीजबिल भरण्यास मदत करतील.- सतीश चव्हाण, संचालक व्यावसायिक, महावितरणवाजवी दरात वीजराजस्थान, यूपी, हरियाणा, पंजाब राज्यात हा प्रकल्प राबविला जाईल. महाराष्ट्रात ४४ हजार कृषी ग्राहक आहेत. सौरऊर्जा करारानुसार वीजदर प्रति युनिट ३ रुपये आहे. वीजखरेदी करार कमी किमतीत झाल्याने ग्राहकांना फायदा होईल. वाजवी दरात वीज उपलब्ध करून देणे हाच उद्देश आहे.- दीपक कोकाटे, प्रमुख, महाराष्ट्र, एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हिसेस लिमिटेड