शहरं
Join us  
Trending Stories
1
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
2
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
3
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
4
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
5
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
6
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
7
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
8
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
9
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
10
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
11
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
12
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
13
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
14
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
15
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
16
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
17
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
18
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
19
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
20
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी

श्रीक्षेत्र भीमाशंकरला हजारो भाविक

By admin | Updated: August 8, 2016 22:36 IST

‘जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय’च्या जयघोषात श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे पहिल्या श्रावणी सोमवारी सुमारे ५० हजार भाविकांनी पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले. श्रावण महिन्यातील

संख्या रोडावली : पहिला श्रावणी सोमवार, विविध कार्यक्रमांचे आयोजन 
 
भीमाशंकर - ‘जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय’च्या जयघोषात श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे पहिल्या श्रावणी सोमवारी सुमारे ५० हजार भाविकांनी पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले. श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असतानाही भाविकांची संख्या कमी  पाहायला मिळाली. सोमवारच्या तुलनेत शनिवार व रविवार या दोन दिवस मोठ्या प्रमाणात भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले.
सोमवारी भीमाशंकरमध्ये दाट धुके व मुसळधार पाउस पडत होता. अशा वातावरणात भाविक दर्शनरांगेत उभे राहून दर्शन घेत होते. यात्रेपूर्वी झालेल्या नियोजनाप्रमाणे रविवार व सोमवार जादा बस गाड्या व पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे वाहतूक सुरळीत सुरू होती. यावर्षी शनिवार, रविवार या सुट्यांंच्या दिवशीही पोलीस हजर असल्यामुळे वाहतूककोंडी झाली नाही.   पुण्याहून आलेल्या बाँबशोधक व नाशक पथकानेही सकाळी मंदिर परिसराची तपासणी केली. 
 भीमाशंकर मंदिरात पोलीस स्थानिक पुजारी व गुरव यांना अरेरावीची भाषा करतात, पोलीस एक दिवस येतात, इतर दिवशी आम्हीच मंदिरातील सुरक्षा पाहत असतो, अशी तक्रार नियोजन बैठकीत विश्वस्तांनी केली होती. या वर्षी पोलिसांनी विश्वस्त व देवस्थानचे सुरक्षारक्षक यांना बरोबर घेऊन बंदोबस्त लावला. त्यामुळे कोणाचीही गैरसोय झाली नाही. दर्शनही व्यवस्थित होत होते.  
 एसटी महामंडळाने वाहनतळ ते मंदिर अशा वाहतुकीसाठी मिनी बस ठेवल्या होत्या. तसेच श्रावणी सोमवारनिमित्त शिवाजीनगर, राजगुरुनगर, नारायणगाव आदी डेपोंतून जादा गाड्या आल्या होत्या. आरोग्य विभागाचे फिरते आरोग्य पथकही तैनात होते. गर्दी कमी असल्यामुळे हॉटेल, पेढा व्यवसायावर परिणाम दिसला. व्यावसायिकही सोमवारच्या तुलनेत इतर दिवशी चांगला व्यवहार होत असल्याचे म्हणत होते. 

वन्यजीव विभाग भीमाशंकरचे वनक्षेत्रपाल तुषार ढमढेरे यांनी प्लॅस्टिक व कचरा गोळा करण्यासाठी कर्मचारी नेमले होते. वन्यजीव विभागाने प्लॅस्टिक निर्मूलनासाठी ठिकठिकाणी फलक लावले असून कचरापेट्या ठेवल्या होत्या. आळंदी येथील स्वकाम सेवा मंडळाचे ५० स्वयंसेवक मंदिर परिसर स्वच्छ करण्याचे काम करीत होते. देवस्थानचे उपकार्यकारी विश्वस्त सुरेश कौदरे, तहसीलदार सुनील जोशी, उपविभागीय पोलीस अधिकारी मितेश घट्टे, घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मारुती देसाई यात्रेचे नियोजन करीत होते.    

 भीमाशंकरकडे दारू पिऊन येणाºया पर्यटकांवर घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मारुती खेडकर कडक कारवाई करीत आहेत. गेल्या एक महिन्यात दारू पिऊन गाडी चालवणाºयांकडून सुमारे पन्नास हजार रुपये दंड वसूल केला आहे. अनेकांना नोटिसा देऊन कोर्टात पाठविले आहे. त्यामुळे दारू पिऊन धिंगाणा घालणा-या पर्यटकांवर लगाम बसला असून दुचाकीच्या अपघातांचे प्रमाणही कमी झाले आहे.