शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कावेरी पाणीवाटपाप्रमाणे सीमा भागातील बांधवांनाही न्याय मिळावा - उद्धव ठाकरे

By admin | Updated: October 3, 2016 08:22 IST

सीमा बांधवांवरील अन्याय कावेरी पाणीवाटपाप्रमाणे दूर करून लोकशाही व न्यायव्यवस्थेची बूज राखावी हीच आमची सर्वोच्च न्यायालयाच्या चरणी प्रार्थना आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - लोकशाही व्यवस्थेत सीमा भागातील मराठी लोक हे या देशाचाच एक भाग आहेत. तरीही कर्नाटक सरकार त्यांच्यावर भाषा, संस्कृतीबाबत जो अन्याय रोज करीत आहे त्यावर सर्वच न्यायालये तोंडात मिठाची गुळणी घेऊन बसली आहेत. जो न्याय कावेरी पाणीवाटपात तामीळनाडूस मिळाला त्याच न्यायाचे हकदार मराठी सीमा बांधवदेखील आहेत. सीमा बांधवांवरील अन्याय कावेरी पाणीवाटपाप्रमाणे दूर करून लोकशाही व न्यायव्यवस्थेची बूज राखावी हीच आमची सर्वोच्च न्यायालयाच्या चरणी प्रार्थना आहे असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सामना संपादकीयच्या माध्यमातून बोलले आहेत.
 
कावेरी पाणीवाटपावरून सर्वोच्च न्यायालय कर्नाटकच्या कमरेत रोज लाथा घालत आहे. याप्रश्‍नी न्यायालयाने कर्नाटकास आणखी एक जोरदार चपराक मारल्याने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सुजलेल्या थोबाडाने स्वत:स जणू कोंडूनच घेतले आहे. तामीळनाडूला दररोज सहा हजार क्युसेक्स पाणी सोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. हे पाहिल्यावर आमच्या मनात विचार आला तो मराठी सीमा बांधवांचा. जो न्याय सर्वोच्च न्यायालयाने तामीळनाडूस दिला तोच न्याय कर्नाटकच्या जबड्यात तडफडणार्‍या २० लाख मराठी सीमा बांधवांना मिळेल काय? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. 
 
तामीळनाडूची जनता कानडी सरकारच्या हेकेखोर वृत्तीमुळे पाण्यासाठी तडफडत होती व त्याच कानडी सरकारच्या मुजोर, मस्तवाल वृत्तीमुळे सीमा भागातील २० लाख मराठी बांधवांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मराठी बांधव न्याय मागत आहेत व कानडी सरकार त्यांना जोरजुलमाने चिरडत आहे. लोकशाही मार्गाने न्याय मिळाला नाही म्हणून हे सर्व खटले सर्वोच्च न्यायालयात उभे राहिले, पण तिथेही या खटल्यांचे घोंगडे भिजत पडले आहे. ते पाहता २० लाख मराठी बांधवांच्या आक्रोशाला आपल्या न्यायव्यवस्थेत काही किंमत आहे की नाही, असाच प्रश्‍न पडतो. कारण जो न्याय पाण्याच्या बाबतीत तामीळनाडूस तडकाफडकी मिळतो तो न्याय २० लाख सीमा बांधवांना ६० वर्षांनंतरही का मिळू नये? अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली आहे. 
 
‘तामीळनाडूस त्यांच्या हक्काचे पाणी सोडा नाहीतर परिणामास सज्ज व्हा!’ असा दम न्यायालयाने कानडी सरकारला भरला आहे. कोणत्याही परिस्थितीत कावेरीचे पाणी तामीळनाडूस न सोडण्याची भूमिका कर्नाटकने घेतली होती, पण न्यायालयाने परखडपणे बजावले, देशातील सर्व राज्यांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केलेच पाहिजे. लोकशाही व्यवस्थेत कर्नाटक राज्य हेदेखील देशाचा एक भाग असल्याचे खडे बोल न्यायालयाने सुनावले आहेत. हेच बोल आमच्या मराठी सीमा बांधवांच्या बाबतीत लागू होतात, पण तिथे मात्र खडे बोल सुनावण्याऐवजी २० लाख मराठी बांधवांचे हक्क खड्यासारखे बाजूला सारले जातात याचे दु:ख आम्हाला वाटते अशी खंत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे.