शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
7
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
8
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
9
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
12
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
13
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
14
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
15
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
16
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
17
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
18
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
19
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
20
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...

हजारो संतप्त आदिवासींचा विष्णू सवरांच्या घराला घेराव

By admin | Updated: October 4, 2016 05:24 IST

आदिवासींचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी किसान सभेच्या हजारो संतप्त कार्यकर्त्यांनी सोमवारी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्या घरासमोर बेमुदत ठिय्या दिला आहे

वाडा (पालघर) : आदिवासींचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी किसान सभेच्या हजारो संतप्त कार्यकर्त्यांनी सोमवारी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्या घरासमोर बेमुदत ठिय्या दिला आहे. सवरा यांनी दिलेला चर्चेचा प्रस्ताव धुडकावून ठोस कृती हवी, अशी ठाम भूमिका आदिवासी बांधवांनी घेतली आहे. मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी सवरा हे सोमवारीच औरंगाबाद येथे गेले आहेत. मंत्री सवरा यांच्या घराला घेराव घालण्यासाठी किसान सभेच्या नेतृत्त्वात रॅली जात असता तिला पोलिसांनी रस्त्यातच अडविले. त्यामुळे आदिवासी बांधवांनी तिथेच ठिय्या आंदोलन केले. जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला होता. या ठिय्यामुळे वाडा-मनोर रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाल्याने पोलिसांनी वाहतूक कंचाडमार्गे वळवली.आदिवासी शेतकरी, देवस्थान शेतकरी व जंगल निवासी, आदिवासी विद्यार्थी यांचे प्रश्न अधिक गंभीर बनत आहेत. आदिवासी भागातील कुपोषण, बालमृत्यू, रोजगारासाठीचे स्थलांतर, आश्रमशाळांतील अपुऱ्या सुविधा, रोजगार आणि देवस्थानच्या जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न आदिवासी विकास मंत्री सवरा असंवेदनशीलपणे हाताळत आहेत. याचा निषेध या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आला.दोन दिवसांत आपण मंत्रालयात चर्चा करू त्यासाठी आपल्या शिष्टमंडळाची व संबंधित खात्याच्या मंत्र्यांची बैठक बोलावतो, आपण ठिय्या मागे घ्यावा हा विष्णू सवरा यांनी दिलेला प्रस्ताव किसान सभेने फेटाळून लावला असून जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत सवरा यांच्या निवासस्थान परिसरातील ठिय्या कायम राहिल, असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे याबाबत काही समेट होण्याची आशा मावळली आहे.या आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे केंद्रीय सहसचिव कॉ. अशोक ढवळे, माजी राज्य अध्यक्ष कॉ. जे. पी. गावित, कामगार नेते नरसय्या आडाम, राज्य अध्यक्ष किसन गुजर, राज्य कार्याध्यक्ष अर्जुन आडे, राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी केले. ----------बससेवा ठप्प झाल्याने पायपीट सकाळपासूनच राज्यभरातून आलेल्या आदिवासी समाजाच्या कार्यकर्त्यांनी वाडा-मनोर, भिवंडी-वाडा महामार्ग जाम केल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. याचा फटका व्यापारी, विद्यार्थी व स्थानिक नागरिकांना बसला. तर या कोंडीमुळे बससेवा ठप्प झाल्याने विद्यार्थ्यांसह, स्थानिकांना पायपीट करावी लागली.