शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

कोपर्डी खटल्यातील दोषींना फाशीच हवी- अॅड. उज्ज्वल निकम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 06:46 IST

अहमदनगर : कोपर्डी येथील मुलीवरील अत्याचार व खुनाची घटना ही दुर्मिळातील दुर्मिळ घटना असल्याने तीनही दोषींना फाशीचीच शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बुधवारी न्यायालयात केला.

अहमदनगर : कोपर्डी येथील मुलीवरील अत्याचार व खुनाची घटना ही दुर्मिळातील दुर्मिळ घटना असल्याने तीनही दोषींना फाशीचीच शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बुधवारी न्यायालयात केला. शिक्षेवरील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपल्याने न्यायालय आता २९ नोव्हेंबरला शिक्षेबाबत फैसला देणार आहे.अ‍ॅड़ निकम म्हणाले, तिघा दोषींनी घटनेच्या दोन दिवस आधी अल्पवयीन मुलगी व तिच्या मैत्रिणीला रस्त्यात अडविले होते. ‘हिला कामच दाखवू’ असे ते म्हणाले होते. त्यानंतर दोन दिवसांनी जितेंद्र शिंदे याने पीडित मुलीला रस्त्यात अडवून बलात्कार करून क्रूरपणे खून केला. भवाळ व भैलुमे यांनी बलात्कार व खून केला नसला तरी या कटात ते सहभागी होते. त्यामुळे तेही फाशीच्या शिक्षेस पात्र आहेत.>खटल्यातील दोषींना पश्चाताप नाहीयुक्तिवादादरम्यान निकम म्हणाले, खटल्यातील तिनही दोषी प्रौढ आहेत. केलेल्या कृत्याचे परिणाम त्यांना माहिती होते़ त्यांच्या चेहºयावर पश्चाताप दिसत नाही़ मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याने न्यायालयासमोर ‘शिक्षा एक दिवसाची काय आणि हजार दिवसांची काय’ असे उर्मट व उद्धट उत्तर दिले आहे. यावरुन दोषींची मानसिकता लक्षात येते.नितीन भैलुमेच्या वकिलास धमकीनितीन भैलुमे याचे वकील प्रकाश आहेर यांना मंगळवारी रात्री अज्ञाताकडून फोनवर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यांच्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.>इंदिरा गांधी हत्येच्या खटल्याचा संदर्भदोषींना फाशी देणे कसे योग्य आहे यावर युक्तिवाद करताना निकम यांनी १० खटल्यांचा संदर्भ दिला़ इंदिरा गांधी यांची दोन अंगरक्षकांनी हत्या केली. मात्र, या कटात सहभागी असणाºया केहरसिंग यालाही फाशीची शिक्षा झाली. संसदेवरील हल्ल्याच्या कटात सहभागी असल्याने अफजल गुरुला फाशी झाली. कटात सहभागी असणे हाही त्या गुन्ह्याचाच भाग असल्याने कोपर्डीतही ते सूत्र लागू पडते, असे ते म्हणाले.

टॅग्स :kopardi caseकोपर्डी खटलाAhmednagarअहमदनगर