शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ही मर्दानगी नाही... माझी पत्नी, बहीण गाडीत नसते तर...; वाहनावरील हल्ल्यानंतर संतोष बांगर यांची थेट प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 09:55 IST

हा हल्ला नाहीच, हा भ्याड हल्ला. हे चोरीचं प्रकरण, घरात शिरायचं, पाकीट मारायचं आणि निघून जायचं. हल्ला कशाला म्हणतात...

शिवसेनेत बंडखोरी करत शिंदे गटात सर्वात शेवटी सामील झालेले आमदार संतोष बांगर यांना रविवारी अंजनगाव सुर्जी येथे शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यावेळी काही शिवसैनिकांनी त्यांच्या वाहनाच्या काचांवर चपला आणि थापा मारल्याची घटना घडली. एवढेच नाही, तर यावेळी ‘50 खोके, एकदम ओके’ अशी नारेबाजीही करण्यात आली. सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास ते येथील मठातून दर्शन करून निघाले असता हा संपूर्ण प्रकार घडला. यावेळी त्याच्यासोबत त्यांची पत्नी आणि बहीणही उपस्थित होते. यानंतर आता आमदार संतोष बांगर यांनी या संपूर्ण घटनेवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 

बांगर म्हणाले "मी, माझी पत्नी आणि बहीण देव दर्शनासाठी गेलो होतो. देव दर्शनानंतर मंदिरातून बाहेर पडलो असता, काही दहा-पाच लोकांनी नारेबाजी केली. माझ्या गाडीवर हात मारण्याचा प्रयत्न केला. याला हल्ला म्हणता येणार नाही. हल्ला कशाला म्हणतात, समोर येऊन कुणी वार करत असेल तर त्याला हल्ला म्हणतात. याला चोरपणा म्हणतात. पूर्वीच्या काळी म्हणत होते, डाका टाकायचा. डाका कशाला म्हणतात, तर घरा पुढे जाऊन फटाका लावायचा आणि सांगायचं, की मी तुमच्या घरावर डाका टाकतोय. तो पूर्वीचा काळ होता. हे चोर प्रकरण आहे."

एवढेच नाही, तर "ही मर्दानगी नाही. माझी बहीण आणि पत्नी गाडीत नसते तर संतोष बांगर काय आहे? हे त्यांना सांगितलं असतं. एक घाव दोन तुकडे  केले नसते. तर सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक म्हणून घेण्याच्या लायकीचा मी नसतो. काही दिवसांपूर्वी, माझ्या गाडीला टच करून दाखवा, अशा आशयाचे वक्तव्य संतोष बांगर यांनी केले होते. यासंदर्भात विचारले असता, मी आजही सांगतो, माझ्या गाडीच्या काचाला टच करून दाखवा, हा संतोष बांगर, जे बोललो होतो ते करून दाखवल्याशिवाय राहणार नाही,"असेही बांगर म्हणाले. ते ‘टीव्ही 9 मराठी’ सोबत बोलत होते. 

हल्ला कशाला म्हणायचं? -हा हल्ला नाहीच, हा भ्याड हल्ला. हे चोरीचं प्रकरण, घरात शिरायचं, पाकीट मारायचं आणि निघून जायचं. हल्ला कशाला म्हणतात. छातीवर वार करणं याला हल्ला म्हणतात. त्यांना तेथेच दाखवलं असतं. माझी पत्नी आणि बहीण नसती ना, मग त्यांना दाखवलं असतं संतोष बांगर काय आहे, असेही बांगर म्हणाले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेAmravatiअमरावती