शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ३० हजार पानांचे आरोपपत्र

By admin | Updated: October 8, 2016 05:17 IST

गिरीश बाबर यांच्यासह १० जणांवर ३० हजार पानांचे आरोपपत्र सोमवारी ठाण्याच्या विशेष न्यायालयात दाखल करण्यात आले.

जितेंद्र कालेकर,

ठाणे- बहुचर्चित बाळगंगा सिंचन प्रकल्पाच्या बांधकाम घोटाळ्यात कोकण पाटबंधारे विभागाचे तत्कालीन कार्यकारी संचालक गिरीश बाबर यांच्यासह १० जणांवर ३० हजार पानांचे आरोपपत्र सोमवारी ठाण्याच्या विशेष न्यायालयात दाखल करण्यात आले. धरणाचे चुकीचे संकल्पचित्र वापरून कामाच्या स्वरूपात वाढ करत राज्य सरकारचे ९२ कोटी ६३ लाख ४२ हजार ११० रुपयांचे नुकसान केल्याचा ठपका या आरोपपत्रात ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातर्फे बांधल्या जाणाऱ्या बाळगंगा प्रकल्पात गैरव्यवहार झाल्याचे आरोप होऊ लागल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी केली. एसीबीच्या विशेष चौकशी पथकाने २५ आॅगस्ट २०१५ रोजी कोपरी पोलीस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. कोकण पाटबंधारे विभागाचे तत्कालीन कार्यकारी संचालक गिरीश बाबर, तत्कालीन मुख्य अभियंता बाळासाहेब पाटील, ठाणे पाटबंधारे मंडळाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता रामचंद्र शिंदे, रायगड पाटबंधारे विभाग-१ कोलाडचे तत्कालीन कार्यकारी अभियंता आनंदा काळुखे, कोलाडचे तत्कालीन सहायक अभियंता राजेश रिठे, कोलाडचे तत्कालीन शाखा अभियंता विजय कासट आणि एफए कन्स्ट्रक्शन आणि एफए एंटरप्रायजेसचे भागीदार फतेह मोहंमद अब्दुल्ला खत्री, निसार खत्री, अबीद फतेह खत्री, झाहीद फतेह खत्री आदी १० जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलारायगड जिल्ह्यातील बाळगंगा नदीवर धरण बांधण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतल्यानंतर कोकण पाटबंधारे विकास महामंडळाने धरणाच्या बांधकामासाठी २००९ मध्ये निविदा मागवल्या होत्या. त्यात चार ठेकेदारांनी निविदा प्रक्रियेत सहभाग घेतल्याचे दाखवण्यात आले. त्यात एफए एंटरप्रायजेस या कंपनीला बाळगंगा धरणाच्या कामाचा ठेका मिळाला. एफए एंटरप्रायजेसचे भागीदार निसार खत्री व इतरांनी निविदा प्रक्रिया स्पर्धात्मक झाल्याचे भासवले. त्यांनी आरएन नायक आणि सन्स, हुबळी या कंपनीने निविदा प्रक्रियेत भाग घेतल्याचे भासवले. >ठेकेदाराला फायदाबाळगंगा धरणाच्या निविदा प्रक्रियेत सहभाग असलेल्या पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी एफए एंटरप्रायजेस या ठेकेदाराला फायदा होण्यासाठी शाई या दुसऱ्याच धरणाचे संकल्पचित्र वापरून अत्यंत घाईगर्दीने प्रकल्पाचा अहवाल तयार केला. नाशिकच्या मध्यवर्ती संकल्पचित्र संघटनेने बाळगंगा धरणासाठी बनवलेले संकल्पचित्र न वापरता शाई धरणाचे संकल्पचित्र वापरुन प्रकल्प अहवाल तयार करून कामही चालू केल्याने कामाची व्याप्ती आणि खर्चही वाढला. तसेच आर्थिक तरतूद होण्यापूर्वीच निविदा प्रक्रिया सुरु केली, असेही आरोपपत्रात म्हटले आहे. एफए कन्स्ट्रक्शनकडे त्याच कालावधीत सहा कामे असल्यामुळे ही कंपनी अपात्र ठरत असतानाही त्यांना निविदा प्रक्रियेत भाग घेण्यास पात्र ठरवण्यात आले. शिवाय, वनजमिनीची अट रद्द केली.या अधिकाऱ्यांकडे कोट्यवधींची मालमत्ता...गिरीश बाबर यांच्यासह १४ जणांच्या घरझडतीत २५ आॅगस्ट २०१५ रोजी करोडो रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती.गिरीश बाबर - ३२ हजार ५०० ची रोकड, राहुरी येथील जमिनीची कागदपत्रेबाळासाहेब पाटील - कोल्हापूर येथे दोन मजली आरसीसी बंगला, विविध बँक खात्यात ६८ लाख ३८ हजारांची रोकड, कार जमिनीसह करोडोंची मालमत्ता.रामचंद्र शिंदे - पुणे ६० लाखांचा फ्लॅट, विविध बँक खात्यात १८ लाख ८१ हजार, दोन कोटी ३७ लाखांच्या सोन्याचे दागिने, सोलापूरसह विविध ठिकाणी जमिनी.आनंदा काळुखे - पत्नी आणि स्वत:च्या नावाने कल्याणसह विविध ठिकाणी ६४ लाखांच्या सहा सदनिका, एक लाख ९९ हजारांची बँक शिल्लक, २० लाख आठ हजारांचे सोन्याचे दागिने तसेच विविध ठिकाणी जमिनी अशी करोडो रुपयांची मालमत्ता.राजेश रिठे (निलंबित अभियंता)- चंद्रकांत रिठे यांचे नावे इंदापूरसह विविध ठिकाणी जमिनी अशी ७० ते ८० लाखांची मालमत्ता.विजय कासट - कल्याण येथे एक लाख ६३ लाखांचा फ्लॅट, नाशिक येथे ३० लाख ८० हजारांची जमीन, याशिवाय, भिवंडी, दिंडोरी येथेही जमिनी, चार लाख ४२ हजारांची रोकड, तीन लाख ६० हजारांचे १९ तोळे दागिने.निसारा खत्री (कंत्राटदार) - खार येथे चार इमारती (२७ हजार २०० चौ. फुटांचे चटई क्षेत्र), १२०० ग्रॅम सोने आणि तीन किलो चांदी निवासस्थानी मिळाली. इमारतीच्या आवारात १३ वाहने. त्यात तीन मर्सिडीज बेण्झ, ३ स्कोडा आणि एका आॅडीचाही समावेश. ही सर्व मालमत्तेचीही माहिती आता आरोपपत्रात एसीबीने न्यायालयाला दिली आहे.