शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
7
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
8
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
9
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
10
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
11
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
12
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
13
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
14
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
15
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
16
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
17
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
18
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
19
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
20
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?

थरांची स्पर्धा नाही पण जिद्दीने फोडली ‘त्यांनी’ हंडी

By admin | Updated: August 22, 2016 03:54 IST

राधा-कृष्णाची वेशभूषा केलेली विशेष दिव्यांग मुले, थरांची स्पर्धा नसली तरी हंडी फोडण्याची जिद्द

ठाणे : ऊनपावसाचा सुरू असलेला खेळ, हंडी फोडण्याच्या जिद्दीने मैदानात जमलेली आणि त्यांच्यातीलच काहींनी राधा-कृष्णाची वेशभूषा केलेली विशेष दिव्यांग मुले, थरांची स्पर्धा नसली तरी हंडी फोडण्याची जिद्द, हंडी फोडल्यावर ढाक्कुमाकुमच्या तालावर थिरकताना त्यांच्या चेहऱ्यावर झळकणारा एक आगळावेगळा आनंद आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जमलेले प्रेक्षक, असा उत्साही माहोल रंगला होता तो शुक्रवारी ठाण्यातील शिवाजी मैदानात. निमित्त होते ते हिंदुहृद्यसम्राट हृद्यस्पर्शी अवयवदान दहीहंडी उत्सवाचे.बाळगोपाळ मित्र मंडळाच्या माध्यमातून विलास ढमाले हे दहीहंडी महोत्सव आयोजित करतात. यंदाचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदा आमटे यांच्या हस्ते हंडीचे पूजन करण्यात आले. यावेळी खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेते अनंत तरे, नगरसेविका पूजा वाघ, आयोजक विलास ढमाले उपस्थित होते. ठाण्याबरोबर अंबरनाथ, डोंबिवली, विक्र ोळी, मालाड, पुणे येथील मतीमंद, गतीमंद, अस्थिव्यंग, अंध, कर्णबधीर, मूकबधीर अशा एकूण १६ शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रत्येक शाळेच्या मुलांना हंडी लावून फोडण्याचा मान मिळाला. विशेष म्हणजे येथे थराची स्पर्धा नसली तरी प्रत्येक शाळेची मुले हंडी फोडण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करत होते. यावेळी उदय आऊटडोअर अ‍ॅडव्हेन्चरच्यावतीने अभय शेट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली रस्सीवर चढणे-उतरणे यांची प्रात्यिक्षके करून दाखविण्यात आली. उपस्थित काही मुलांनीही यात सहभाग नोंदवला. याचदरम्यान अवयवदान आणि देहदानाचे मिळून १३४ फॉर्म भरण्यात आले. पालकमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. सहभागी सर्व शाळांना समान रकमेचे पारितोषिक आणि चषक देण्यात आला. >सहानुभूतीपेक्षा जिद्द निर्माण करा - प्रकाश आमटेबाबांनी सुरूवातीपासूनच अशा दिव्यांग लोकांना एकत्र केले. मी आणि माझा भाऊ विकास आमचे बालपण अशाच माणसांमध्ये गेले आहे. त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाला अशा विशेष मुलांमध्ये येऊन आपल्या घरी आलो असे वाटतयं, असे मत डॉ.प्रकाश आमटे यांनी व्यक्तकेले. अशा माणसांसाठी समाजाने सहानुभूती दाखविण्यापेक्षा त्यांच्यात जिद्द निर्माण केली पाहिजे. त्यांच्या उद्धारासाठी आपण सहकार्य केले पाहिजे. तर कार्यक्रम कधीही छोटा किंवा मोठा नसतो. तर जिथे जाऊन आपल्याला मोठा आनंद, समाधान मिळेल अशा ठिकाणी आम्ही जातो, असे ते म्हणाले. तर अवयवदान ही मोठी चळवळ असून अवयवांचे दान करून इतरांचे जीवन वाचवले पाहिजे. त्यांच्या जीवनात आपण आनंद फुलवला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.