शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

तिसरी-चौथीच्या पाठ्यपुस्तकांत चुकांचा सुकाळ

By admin | Updated: January 19, 2015 04:01 IST

इतिहासाच्या अभ्यासक्रमातून वर्तमानकाळाला सामोरे जाण्याची व भविष्याचा वेध घेण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, असा उद्देश असतो

संजय वाघ, नाशिकइतिहासाच्या अभ्यासक्रमातून वर्तमानकाळाला सामोरे जाण्याची व भविष्याचा वेध घेण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, असा उद्देश असतो. मात्र बालभारतीच्या अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या तिसरी व चौथीच्या ‘परिसर अभ्यासा’च्या पुस्तकांत अनेक गंभीर चुका झाल्याचे निदर्शनास आले आहे.नव्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता तिसरी व चौथीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीस प्रारंभ झालेला आहे. दोन्ही पुस्तकांतील राष्ट्रगीतात सिंध ऐवजी सिंधू तसेच ‘आशिष’ ऐवजी ‘आशिस’ असे चुकीचे छापलेले आहे. तिसरीच्या परिसर अभ्यास या पाठ्यपुस्तकातील चौथ्या प्रकरणातील पान क्र. २८ वरील आपले जग दर्शविणाऱ्या नकाशातील पृथ्वीगोलावर उत्तर धु्रवीय आर्क्टिक महासागर व दक्षिण धु्रवीय अंटार्क्टिका खंड एकाच दृष्टिक्षेपात एकाच वेळी खंडाच्या पूर्ण भूआकारात दाखविण्याचा चमत्कार केला आहे. तसेच दक्षिण व उत्तर अमेरिका खंडनकाशाचे विकृतीकरण झालेले आहे. सहाव्या प्रकरणातील पान क्र. ३४ वरील रायगड किल्ल्याचे चित्र एखाद्या पडक्या वाड्यासारखे प्रभावहीन वाटते. नवव्या प्रकरणातील पान क्र. ५५ वरील नाशिक जिल्ह्यातील प्रमुख भूरूपे दर्शविणाऱ्या नकाशासोबतच्या संदर्भ सूचीत खिंड दर्शविलेली नसताना धोडब खिंड दाखविली आहे. वास्तविक नाशिक जिल्ह्यात धोडब खिंडच अस्तित्वात नाही. चौथीच्या परिसर अभ्यास भाग पहिला या पाठ्यपुस्तकातील नवव्या प्रकरणात पान क्र. ५८वर वातावरणाची माहिती देताना पृथ्वीपासून उंच गेल्यास जवळ जवळ ५० कि.मी.पर्यंत हवा आहे, असे नमूद केले आहे. वास्तविक हवेचे थर त्यापेक्षाही जास्त उंचीवर असतात. (संदर्भ : मराठी विश्वकोश खंड १३वा चित्रपत्र क्र. ५८ शेवटचे पृष्ठ) ११व्या प्रकरणात पान क्र. ७३वर मेंदूसंबंधीच्या दोन चित्रांतील मेंदूचा रंग चुकीचा दाखविला आहे. वास्तविक मानवी मेंदूचा रंग फिकट गुलाबी (पिंक) असतो मात्र चित्रात फिकट निळसर दाखविण्याची गंभीर चूक झाली आहे. १६व्या प्रकरणात पान क्र. १०२ व १०३वरील दिवस आणि रात्र स्पष्ट करणाऱ्या माहितीत संपूर्ण वर्षात २२ मार्च आणि २२ सप्टेंबर या दोनच तारखांना १२ तासांचा दिवस आणि १२ तासांची रात्र असते, अशी चुकीची माहिती आहे. वास्तविक, २१ मार्च व २३ सप्टेंबरला दिवस आणि रात्र बारा-बारा तासांचे असतात. २२व्या प्रकरणाच्या पान क्र. १३६वरील ‘करून पहा’ या परिच्छेदात- मांजर, कुत्रा या प्राण्यांच्या यादीत चिमणी व कावळा यांनाही प्राणी म्हटले आहे. चौथीच्या परिसर अभ्यास (शिवचरित्र) भाग २मधील सातव्या प्रकरणातील पान क्र. २६वरील तोरणा किल्ल्याच्या दुरुस्तीत मोहरांनी भरलेल्या चार घागरी सापडल्याचा उल्लेख आहे. याबाबत मतभेद आहेत. नवव्या प्रकरणाच्या पान क्र. ३३वरील किल्ले प्रतापगड म्हणून दिलेले चित्र गैरसमज निर्माण करणारे आहे. हे चित्र मुख्य किल्ल्याच्या खालील उतारावर किल्ल्याला जोडून पुढे आलेल्या एका सोंडेचे आहे. याच प्रकरणातील पान क्र. ३४वर अफजल खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा बडा सय्यद असा चुकीचा उल्लेख झालेला आहे. १०व्या प्रकरणातील पान क्र. ३७वर शिवा काशिद याचा शिवाजी केशभुषाकार असा त्रोटक नामोल्लेख केलेला आहे. अशा चुकांमुळे विद्यार्थ्यांची दिशाभूल होण्याच्या शक्यता आहेत.