शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक नाट्याची आज तिसरी घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 04:54 IST

गेले काही महिने नाट्यसृष्टीत रंगलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणूक नाट्याची तिसरी घंटा आज संध्याकाळी वाजणार आहे. सध्या गाजत असलेल्या नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा संपूर्ण अधिकृत निकाल आज (दि. ७ मार्च) जाहीर होणार आहे.

- राज चिंचणकर मुंबई  - गेले काही महिने नाट्यसृष्टीत रंगलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणूक नाट्याची तिसरी घंटा आज संध्याकाळी वाजणार आहे. सध्या गाजत असलेल्या नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा संपूर्ण अधिकृत निकाल आज (दि. ७ मार्च)जाहीर होणार आहे. मुंबईसह राज्यातल्या इतर ठिकाणचे निकालही या वेळी घोषित करण्यात येतील. त्यामुळे बहुचर्चित निवडणुकीतकोणाची सरशी होणार, यावरचाही पडदा उघडला जाणार आहे. मुंबई मध्यवर्ती, मुंबई उपनगर, नागपूर, अकोला, वाशीम, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, बेळगाव या ठिकाणी झालेल्या नाट्य परिषदेच्या निवडणुकीचे अधिकृत निकाल आज हाती येतील. मुंबईमध्यवर्ती विभागात एकूण ११ जागा असून, मुंबई उपनगरात ५ जागा आहेत. या निवडणुकीत नाट्य परिषदेचे माजी अध्यक्ष मोहन जोशीयांना निवडणूक लढविता आली नसली, तरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली सक्रिय ‘मोहन जोशी पॅनल’ आणि प्रसाद कांबळी व सहका-यांचे ‘आपलं पॅनल’ यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यांच्याबरोबरच मुंबई उपनगरात सक्रिय असलेले ‘नटराज पॅनल’ आणि काही अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीत रंगत आणली होती. 

 नाट्य परिषदेचे प्रमुख निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी हे निवडणुकीचा अधिकृत निकाल नाट्य परिषदेच्या मुंबई मध्यवर्तीकार्यालयात घोषित करणार आहेत. मुंबईसह इतर जिल्ह्यांतील निवडणुकीचे निकाल काय लागतात, यावर नाट्य परिषदेवर कुणाचा अंकुश राहणार हे नक्की होणार आहे. निकालानंतर काही दिवसांतच नवनिर्वाचित सदस्यांची बैठक होऊन पुढचीपावले उचलली जातील. त्यानंतरच नाट्य परिषदेच्या भावी अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते ते ठरणार आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रentertainmentकरमणूक