मिरज/लातूर : मिरजेहून कृष्णेचे पाणी घेऊन जलपरीने गुरुवारी तिसरी फेरी पूर्ण केली़ लातूर रेल्वे स्थानकात संध्याकाळी सहा वाजता दहा वॅगन घेऊन ही जलपरी पोहोचली़ त्यानंतर विहिरीत पाणी उतरविण्यास प्रारंभ झाला. तिसऱ्या खेपेलाही पाच लाख लिटर्स पाणी आणण्यात आले़गेल्या दोन दिवसांपासून जलपरीच्या फेऱ्या सुरु आहेत़ शुक्रवारी आणखी दहा टँकर पाठविण्यात येणार असून मिरजरेल्वे यार्डापर्यंत जलवाहिनीचेकाम पूर्ण झाल्यानंतर सोमवारपासून ५० टँकर भरून रेल्वे लातूरलाजाणार आहे. मिरजेतून सोमवारी, बुधवारी व त्यानंतर गुरुवारी दहा टँकरची तिसरी खेप लातूरला रवाना झाली. आणखी दहा टँकर भरण्याचे काम रेल्वे स्थानकात सुरू असून शुक्रवारपर्यंत टँकरमध्ये पाणी भरल्यानंतर ही रेल्वे लातूरला पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे लातूरला नियमित पाणी पुरवठा सुरू होणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
‘पाणी एक्स्प्रेस’ची तिसरी खेप!
By admin | Updated: April 15, 2016 02:06 IST