शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच केले लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2017 10:16 IST

पुणे : नेहमी वर्दळीचा रस्ता असलेल्या कोंढव्यातील खडी मशीन चौकातील अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम मशीनच पळवून नेल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली.

पुणे : नेहमी वर्दळीचा रस्ता असलेल्या कोंढव्यातील खडी मशीन चौकातील अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम मशीनच पळवून नेल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली. या एटीएम सेंटरला सुरक्षारक्षक नव्हते.या प्रकरणी हिताची सर्व्हिसेस या कंपनीचे चॅनल मॅनेजर देविदास अय्यर (वय ४५, रा. वारजे माळवाडी) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील खडी मशीन चौकातून दिवसरात्र वाहतूक असते. अशा अहोरात्र वाहतूक असलेल्या कोंढव्यातील खडी मशीन चौकातील बधेनगरमध्ये अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम सेंटर आहे. हे एटीएम सेंटर केवळ एक महिन्यापूर्वीच सुरू झाले आहे. या एटीएम सेंटरमध्ये शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास चोरट्यांनी प्रवेश केला. एटीएम मशीनची वायर कापली व कशाच्या तरी सहाय्याने एटीएम मशीन उचकटून ती मशीनच चोरुन नेली. या एटीएममध्ये ४ लाख ५४ हजार ९०० रुपये होते. याच इमारतीत राहणारे एटीएम असलेल्या दुकानाच्या मालकाना सकाळी सहाच्या सुमारास एटीएम फोडले असल्याचे लक्षात आले. त्यांनी कोंढवा पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. त्यात या एटीएम सेंटरमध्ये कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याचे दिसून आले.एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही लावलेले असतात. अनेक ठिकाणी केवळ एटीएम मशीनवरच फक्त कॅमेरा असतो. या ठिकाणी तुम्ही पैसे काढले तरच मशीनमधील कॅमेरा फोटो काढतो. आता एटीएम मशीनच चोरुन नेल्याने व तेथे सीसीटीव्ही नसल्याने चोरट्यांचे चित्रीकरण मिळू शकलेले नाही. कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :atmएटीएम