शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात उलटे टांगून मारल्याने चोरट्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 06:41 IST

ठाणे : चोरीच्या उद्देशाने सोमवारी पहाटे घरात शिरलेल्या शत्रुघ्न यादव (२२) याला कळव्यातील स्थानिक रहिवाशांनी बेदम चोप दिल्याने त्याचा मृत्यू झाला.

ठाणे : चोरीच्या उद्देशाने सोमवारी पहाटे घरात शिरलेल्या शत्रुघ्न यादव (२२) याला कळव्यातील स्थानिक रहिवाशांनी बेदम चोप दिल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात गगनप्रसाद यादव (५२, रा. भास्करनगर, कळवा) याच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे.भास्करनगर भागात गगनप्रसाद याचे तळ अधिक एक मजला असे चाळीतील घर आहे. त्यांच्या घरात शत्रुघ्न चोरीच्या उद्देशाने सोमवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास शिरला. वरच्या मजल्यावरील गॅलरीत झोपलेल्या गगनप्रसाद याला त्याच्या पायाचा धक्का लागला. तेव्हा गगनप्रसादने आरडाओरडा केल्याने त्याने पहिल्या मजल्यावरून उडी मारली. तोपर्यंत घरातील इतर मंडळीही जागी झाली. खालच्या खोलीतून बाहेर पडलेल्या राजेंद्र (२६) या मुलाने शत्रुघ्नला पकडले. त्यापाठोपाठ पंचलाल यादव (३०) आणि जयहिंद उपाध्याय (४७) हेही आले. चोरीचा जाब विचारत त्यांनी शत्रुघ्नला बेदम मारहाण केली. त्यांच्यापैकी एकाने त्याला सरळ उलटा टांगला. नंतर बांबूने काळा-निळा होईपर्यंत जबर मारहाण केली. यामुळे शत्रुघ्न निपचित पडल्यानंतर त्यांच्यापैकीच एकाने पोलिसांना चोर पकडल्याची खबर दिली. पोलिसांनी त्याला आधी कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्याआघीच तो मरण पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. प्रकरण अंगलट येईल हे लक्षात आल्यावर यादव कुटुंबीयांनी किंवा चाळीतील कोणीही चोराला मारले नाही, असा पवित्रा रहिवाशांनी घेतला. अखेर पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांनी पोलिसी खाक्या दाखवल्यावर गगनप्रसाद आणि त्याच्या कुटुंबीयांनी केलेल्या बेदम मारहाणीत शत्रुघ्नचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. राजेंद्रसह चौघांना सोमवारी रात्री पोलिसांनी अटक केली. त्यांना २६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.>शत्रुघ्न यादव याच्याविरुद्ध यापूर्वीही कळवा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे. तो या गुन्ह्यात जामिनावर सुटलेला असतानाच त्याने पुन्हा चोरीचा प्रयत्न केला.

टॅग्स :thaneठाणेDeathमृत्यू