शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ अधिकारी येणार गोत्यात

By admin | Updated: June 5, 2017 05:24 IST

राज्यभरातील अनेक अधिकाऱ्यांनी संपर्क साधला होता, अशी माहिती उघड झाली असून, अशा सर्व अधिकाऱ्यांची मुंबई गुन्हे शाखेमार्फत चौकशी होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य प्रशासन आणि पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या रॅकेट प्रकरणातील महानंद डेअरीचा महाव्यवस्थापक विद्यासागर हिरमुखे आणि त्याच्या साथीदारांशी राज्यभरातील अनेक अधिकाऱ्यांनी संपर्क साधला होता, अशी माहिती उघड झाली असून, अशा सर्व अधिकाऱ्यांची मुंबई गुन्हे शाखेमार्फत चौकशी होणार आहे. राज्यातील पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदलीचे रॅकेट उघड झाल्यानंतर, हे प्रकरण दाबण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते. आता या प्रकरणात राज्य पोलीस दलातील अनेक आयपीएस व मपोसे अधिकारी या टोळीच्या संपर्कात होते, अशी प्राथमिक माहिती मुंबई गुन्हे शाखेला मिळाली आहे. या प्रत्येकाला येत्या काळात गुन्हे शाखेत चौकशीला सामोरे जावे लागेल, असे संकेत मिळत आहेत. टोळीच्या संपर्कात आलेले, पण बदलीच्या आमिषाकडे दुर्लक्ष केलेले अधिकारीही या प्रकरणी गोत्यात येण्याची दाट शक्यता आहे. या टोळीबाबत माहिती असूनही वरिष्ठांना कळवून कारवाई न केल्याचा ठपका या अधिकाऱ्यांवर ठेवला जाऊ शकतो, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला सांगितले की, हिरमुखे व त्याच्यासह अटक करण्यात आलेल्या अन्य तीन आरोपींच्या चौकशीतून, मोबाइल फोनच्या तपासणीतून राज्यातील अनेक छोटे-बडे सरकारी अधिकारी या टोळीच्या संपर्कात होते. त्यात पोलीस दलातील अधिकाऱ्यांची संख्या अधिक आहे. या प्रकरणातील तक्रारदार व सोलापूरचे पोलीस उपायुक्त नामदेव चव्हाण यांच्याप्रमाणे, या टोळीने राज्य पोलीस दलातील अनेकांशी संपर्क साधून, मनाप्रमाणे बदलीचे आमिष दाखवल्याचा प्राथमिक अंदाज गुन्हे शाखेने वर्तवला आहे. मात्र, ही टोळी अधिकाऱ्यांकडे पोहोचली की, अधिकारीच बदलीचे गाऱ्हाणे घेऊन या टोळीकडे आले, तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी या टोळीच्या माध्यमातून बदली करून घेतली का की, आमिषाकडे दुर्लक्ष केले, या अंगानेही तपास होत आहे. या सर्व बाजू आरोपी, संबंधित अधिकारी यांच्या प्रत्यक्ष व तांत्रिक तपासातून अधिक स्पष्ट होणार आहेत. दुर्लक्ष केले असल्यास, टोळीचे हे सगळे अवैध उद्योग दडवून का ठेवले, अशी विचारणा अधिकाऱ्यांकडे होऊ शकते. दरम्यान, या टोळीच्या संपर्कात आलेल्या अधिकाऱ्यांची यादी तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. पाचवा आरोपी अटकेतया रॅकेट प्रकरणात पुण्यातील कमलेश कानडे याला सहारा रोड येथून अटक करण्यात आली आहे. तो हिरमुखे याचा मित्र असल्याचे कॉल रेकॉर्डवरुनसमोर आले आहे. हा या प्रकरणातील पाचवा आरोपी आहे. >वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मौनया प्रकरणाच्या तपासाबाबत गुन्हे शाखेकडून कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. गुन्हे शाखेचे सहआयुक्त संजय सक्सेना, अतिरिक्त आयुक्त के. एम.एम. प्रसन्ना, उपायुक्त दिलीप सावंत, सहायक आयुक्त विनय कुलकर्णी आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला. तथापि, ही कारवाई झाल्यापासून गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सतत बैठका सुरू आहेत. प्राप्त माहितीनुसार, या कारवाईचा आवाका मोठा असल्याने, तपासाची सुई बड्या सरकारी अधिकाऱ्यांसह राजकीय पुढाऱ्यांपर्यंत पोहोचेल, त्याचा अंदाज आल्याने, वरिष्ठ अधिकारी पुढील तपासाच्या दृष्टीने व्यूहरचना करत आहेत.