शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

त्यांनी शोधला टोलमुक्तीचा नवा पर्यायी मार्ग

By admin | Updated: June 14, 2016 02:48 IST

नागपूर-अमरावती हा राष्ट्रीय महामार्ग अतिशय सुंदर झाला खरा; पण त्यावर एका बाजूने १७१ रुपये टोल द्यावा लागत असल्याने हा मार्ग टाळून टोलमुक्तीचा नवा मार्ग वाहनचालक

नागपूर : नागपूर-अमरावती हा राष्ट्रीय महामार्ग अतिशय सुंदर झाला खरा; पण त्यावर एका बाजूने १७१ रुपये टोल द्यावा लागत असल्याने हा मार्ग टाळून टोलमुक्तीचा नवा मार्ग वाहनचालक अवलंबित असल्याने या महामार्गावरील वाहतूक रोडावली असून पर्यायी मार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी दिसू लागली आहे. नागपूर-अमरावती मार्गावरुन दरदिवशी १० हजार वाहने जात असत. आज ही संख्या पाच ते सहा हजारावर आली असल्याचे गोंडखैरी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी लोकमतच्या प्रतिनिधीला सांगितले.असा आकारला जातो टोल अमरावती रोडवर एकूण चार टोल नाके आहेत.त्यात गोंडखैरी, कारंजा, तिवसा आणि नांदगावपेठ नाक्याचा समावेश आहे. एका कार चालकाला नांदगावपेठ टोलवर ८० रुपये, कारंजा ४० रुपये, गोंडखैरी ४१ रुपये आणि तिवसा १० रुपये असा एकूण १७१ रुपये एका वेळचा टोल द्यावा लागतो. येण्याजाण्याचा टोल गृहित धरल्यास तर ३४२ रुपये पडतात. परंतु दोन्ही वेळच्या टोलची पावती एकाचवेळी फाडली तर ६० टक्के कमी टोल लागतो. त्यामुळे २५० रुपयाच्या जवळपास हा टोल पडतो. सर्व र्बंकारच्या चारचाकी व त्यापुढील वाहनांसाठी येथे टोल द्यावा लागतो. टोलचा बोजा टाळण्यासाठी आता नागपूर-बुटीबोरी-केळझर-सेलू-पवनार-पुलगाव-अंजनसिंगी-कुऱ्हा-अमरावती या मार्गाने जाण्यास वाहनचालक पसंती देत आहेत. काही जण पुलगावच्या पुढे चांदूर बाजारमार्गे अमरावती गाठतात. (प्रतिनिधी)अपघाताचा धोका अधिक : नागपूर-बुटीबोरी-केळझर मार्र्गेे अमरावती ही वाहतूक कमालीची वाढली आहे. अमरावती मार्गावरील चारचार टोलनाक्यांमुळे हे घडत आहे. कारसोबतच ट्रॅव्हल्स बस, टॅक्सीसुद्धा अमरावतीसाठी वर्धा रोडचा वापर करू लागले आहेत. पर्यायी मार्ग हा प्रशस्त नसल्याने आणि वाहतूक वाढल्याने अपघाताचा नेहमीच धोका असतो. टोल नाके हटवा : कारने अमरावतीला ये-जा करायची तरी एका कारमागे २५० रुपये द्यावे लागत असतील तर लोक पर्यायी मार्गाने जाणारच. अमरावती मार्ग सुंदर झाला आहे पण टोलचा जाच अन्यायकारक आहे. तो रद्द केला पाहिजे. - नरेश वाहाणे, अध्यक्ष, रिपब्लिकन मूव्हमेंट