शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ अधिकारी अद्याप सापडले नाहीत!

By admin | Updated: August 31, 2015 01:15 IST

दाऊदला पकडण्यासाठी गुप्तहेर खात्याने (आयबी) लावलेला सापळा मुंबई पोलिसांपैकी नेमका कोणी उधळून लावला हे अजून गृह विभागाला शोधता आलेले नाही. अंडरवर्ल्डमध्ये सक्रिय असलेल्या छोटा

डिप्पी वांकाणी, मुंबईदाऊदला पकडण्यासाठी गुप्तहेर खात्याने (आयबी) लावलेला सापळा मुंबई पोलिसांपैकी नेमका कोणी उधळून लावला हे अजून गृह विभागाला शोधता आलेले नाही. अंडरवर्ल्डमध्ये सक्रिय असलेल्या छोटा राजनच्या हस्तकांचा वापर करून दाऊदला पकडण्याची आयबीची योजना होती परंतु ती मुंबई पोलिसांपैकी काही अधिकाऱ्यांमुळे फसली, असा गंभीर आरोप माजी गृहसचिव आर. के. सिंह यांनी नुकताच केला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणाच्या चौकशीचेही आदेश दिले परंतु ‘ते’ पडद्यामागचे अधिकारी कोण हा प्रश्नच आहे.सूत्रांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार चौकशीमध्ये सरकार कोणत्याही पोलिसावर कारवाई करणार नाही परंतु ही माहिती बाहेर येण्याची सरकारला प्रतीक्षा आहे. कारण दिल्लीमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून अजित डोवल असून भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या पुढील महिन्यात अपेक्षित आहेत. दाऊदला संपविण्यासाठी आयबीने आखलेली योजना मुंबई पोलिसांपैकी काही अधिकाऱ्यांनी छोट्या राजनच्या हस्तकांना अटक करून फसविली. संबंधित हस्तकांना अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना दाऊदला संपविण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले होते, असे आर. के.सिंह यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. ही घटना २००५ मधील. त्यावेळी वाजपेयींचे सरकारन नव्हते. ११ जुलै २००५ रोजी छोटा राजनचे जवळचे साथीदार विकी मल्होत्रा आणि फरीद तनाशा यांना तेव्हाचे मुंबईचे उपआयुक्त धनंजय कमलाकर व त्यांच्या तुकडीने अटक केली होती. दाऊदला संपविण्याच्या अंतिम योजनेवर कमलाकर माजी आयबी प्रमुख अजित डोवल यांच्याशी चर्चा करीत होते. संयुक्त अरब अमिरातमधील गँ्रड हयात हॉटेलमध्ये क्रिकेटपटू जावेद मियाँदादच्या मुलाशी दाऊदची मुलगी मारूख हिचे लग्न २३ जुलै रोजी होणार होते व त्याच दिवशी दाऊदला ठार मारण्याची योजना होती.‘हॉटेलवर छापा मारला गेला तेव्हा डोवल आणखी दोघांबरोबर होते, असे मी म्हणणार नाही परंतु ते त्या परिसरात होते. तत्कालीन आयुक्त ए. एन. राय आणि सहआयुक्त मीरा बोरवणकर यांनी फरीद व विकी यांना तेथे अटक केली. येथेच आयबीसंदर्भात काही तरी चुकीचे घडले,’ असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. अर्थात त्या दोघांना अटक केल्यामुळेच आयबीची योजना फसली असे म्हणणे धाडसाचे ठरेल. कारण आयबीच्या अशा मोठ्या गुप्त योजनांना पर्याय म्हणून दुसरीही योजना तयार असते, असेही हा अधिकारी म्हणाला.एवढेच नव्हे पोलीस जेव्हा दरोडेखोरांना पकडायला जातात त्यावेळीही त्यांच्याकडे दोन -तीन योजना हाताशी असतातच. येथे आयबी दाऊदला संपविण्याची (विदेशात) योजना आखते तेव्हा त्या योजनेला पूरक म्हणून आणखी योजना असणारच. ही योजना अंमलात आणणारे अधिकारी संयुक्त अरब आमिरातीमधील संबंधित ठिकाण परिचयाचे व्हावे यासाठी किमान दोन महिने आधी मुक्कामाला असतील. शिवाय त्यांनी योजनेची रंगीत तालीमही केली असेल. योजनेची अंमलबजावणी ही एखाद्या समारंभासारखी व्हावी यासाठी प्रयत्न केले असतील, असे हा अधिकारी म्हणाला.आयबीने हे प्रकरण सहजपणे सोडून दिलेले नाही. त्या दोघांना अटक झाल्यानंतर आयबीने त्या पोलीस अधिकाऱ्याला धडा शिकविण्यासाठी इन्स्पेक्टर असलम मोमिन व दाऊदचा भाऊ इकबाल कासकर यांच्यातील संभाषण लीक केले. तेव्हा मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आर. एस. शर्मा असताना मोमिनचा अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधांची माहिती त्यांनी दिली होती व शर्मा यांनी मला ही माहिती असल्याचे सांगितले होते. परंतु मल्होत्राला अटक झाल्यानंतर पोलिसांनी ते संभाषण लीक केले. या संभाषणात कासकरला मोमिन असे आश्वासन देतो की तू भारतात परत आलास, शरण गेल्यास तुला काहीही होणार नाही. या पार्श्वभूमीवर राय यांनी मोमिनला काढून टाकले होते, असे हा अधिकारी म्हणाला. दुसऱ्या एका प्रयत्नात भारतीय हवाई दलाचे विमान वापरायचे ठरले होते. दाऊद आयएसआयचे लोक असलेल्या विमानांनी दुबई आणि जेद्दाहसारख्या ठिकाणी भेट देतो असे त्याचे विमान हवाई दलाच्या विमानाने सक्तीने उतरविण्याची योजना होती. अर्थातच ही योजना खूपच अवघड होती तरीही रॉने तिचा गांभीर्याने विचार केला होता.आयबी छोटा राजनच्या माणसांचा वापर दाऊदच्या विरोधात अनेक वर्षांपासून करीत असल्याची माहिती पोलीस वर्तुळात आहेच. व्हिएतनाममध्ये २०१० मध्ये छोटा राजनचा साथीदार बंटी पांडे याला अटक करण्यात आली. त्याने त्याची चौैकशी करणाऱ्यांना सांगितले होते की, त्याने २००० ते २०१० दरम्यान दाऊदला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. पहिला प्रयत्न १९९८ मध्ये पाकिस्तानमध्ये केला होता. क्लिफ्टन एरियातील मशिदीत दाऊद शुक्रवारच्या प्रार्थनेसाठी येणार होता. तेथे मी, फरीद तनाशा व विकी मलहोत्रा वेश बदलून त्याची वाट बघत होतो. परंतु आमचा जो साथीदार आम्हाला शस्त्र आणून देणार होता तो तेथे आलाच नाही. दाऊदची मुलगी सारा हिचे निधन झाल्यावर तो दफनविधीसाठी येईल हा आमचा विचार होता. तिसरा प्रयत्न संयुक्त अरब अमिरातीमध्ये दाऊदच्या मुलीच्या लग्नात करण्याचे ठरले होते, परंतु मलहोत्रा आणि तनाशा यांना अटक झाल्यामुळे तो फसला व तो पळून जाऊ शकला, असेही बंटी पांडेने सांगितले. पांडेच्या म्हणण्यानुसार १९९४ पासून दाऊदला ठार मारण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. रॉने (रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंग) छोटा राजनच्या लोकांना प्रशिक्षण देऊन नेपाळहून नेपाळच्या बनावट पासपोर्टवर पाकिस्तानला पाठविले होते. हे लोक क्लिफ्टन भागात मुक्कामालाही होते. एखादी योजना अमलात आणण्यात रॉला अपयश येत नाही, असे समजले जाते परंतु शेवटच्या क्षणाला ती योजना निष्फळ ठरली.