शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या राजकारणात उलथापालथ होईल; संत बाळूमामाच्या भाकणुकीत नेमकं काय म्हटलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 21:18 IST

पैसा न खाणारा सापडणार नाही. भ्रष्टाचार फोफावेल. नेतेमंडळी तुरुंगात जातील असंही भविष्यवाणीत म्हटलं आहे.

कोल्हापूर – आदमापूर येथील संत बाळूमामा भाकणुकीचा सोहळा मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याला लाखो भाविकांनी हजेरी लावली होती. मराठी वर्षाचा शेवटची भाकणूक असल्यानं अनेकांचे लक्ष आगामी भविष्यात नेमक्या काय घडामोडी घडतील याकडे लक्ष लागलं होते. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडी सरकार असल्याने या तिन्ही पक्षात किती काळ समन्वय राहील हे सांगणे कठीण आहे.

त्यातच विरोधी पक्ष भाजपा सातत्याने सरकार पडणार असल्याची तारीख देत असतो परंतु अडीच वर्ष सरकारला काहीही झाले नाही. मात्र या काळात सरकारचे २ मंत्री कोठडीत गेले आहेत. त्यामुळे सरकारवरील टांगती तलवार कायम आहे. त्यात बाळूमामाच्या भाकणुकीत देशाच्या राजकारणाच्या संदर्भात भविष्यवाणी करण्यात आली आहे. राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल. राजकारणी मंडळी मोठ्या प्रमाणात पक्षांतर करतील अशी भविष्यवाणी करण्यात आली आहे.

इतकेच नाही तर राजकारणी मंडळी सत्ता संपत्तीच्या मागे लागतील. काँग्रेस पक्षात चिंतेचे वातावरण राहील. कमळाचा झेंडा मिरवेल आणि काँग्रेसमध्ये चिंतेचे वातावरण पसरेल. देवा धर्माला विसरून लोकं राजकारणात जातील. पैसा न खाणारा सापडणार नाही. भ्रष्टाचार फोफावेल. नेतेमंडळी तुरुंगात जातील. राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होईल अशी भविष्यवाणी करण्यात आली आहे.

आणखी काय म्हटलं भाकणुकीत?

साखरेचा भाव तेजी मंदीत राहील. गुळाचा भाव उच्चांकी राहील. साखर सम्राटांची खुर्ची डळमळीत राहील. उसाच्या कांड्यांचा दुधाच्या भांड्यानं राज्या-राज्यात गोंधळ निर्माण होईल. शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण होईल. सीमा भागातले राजकारण ढवळून जाईल. निपाणी भागात मोठा गोंधळ होईल. सीमा प्रश्न राजकीय लोकांच्या फक्त चर्चेत राहील. दीड महिन्यात धान्य उदंड पिकेल. खरीप पिक चांगले होईल. गोर गरीबाला पुरावा करील‌. तांबडी रास मध्यम पिकेल. पांढर धान्य उदंड पिकलं. गव्हाची शेती मध्यम पिकेल. ज्याच्या घरी धान्य तो शहाणा होईल. वैरण सोन्याची होईल सांभाळून ठेवा. बैलाची किंमत बकऱ्याला येईल वैरण – धान्याच्या मोठ्या प्रमाणात चोरी होतील. सरकी फुकाची होईल. बैलाची किंमत बकऱ्याला येईल. बकऱ्याचा भाव लाखांवर जाईल. बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल. कोंबड मनुष्याच्या पाठीशी लागेल. धनगराच बाळ मेंढी म्हणून अस्वलाला मिठी मारेल.

टॅग्स :Politicsराजकारण