वर्धा : चंद्रपूरपाठोपाठ वर्धेतही ‘नो व्हेईकल डे’चा प्रारंभ झाला. वर्धेकरांनी एक पाऊल पुढे टाकत प्रत्येक आठवड्यातील गुरुवारी हा दिवस न चुकता पाळण्याचा निर्धार केला आहे. या गुरुवारी सुटी असल्यामुळे आगामी गुरुवारपासून शासकीय अधिकारी आणि कर्मचारी हा दिवस पाळणार आहेत. विविध संघटनांसह वर्धेकरांनी लोकमतच्या जिल्हा कार्यालयापासून या दिवसाचा शुभारंभ केला. सायकल व पायी निघालेले वर्धेकर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहचताच खा. रामदास तडस हेसुद्धा सहभागी झाले. त्यांनी सायकलवरून एक किमीचा प्रवास केला. स्वत:च्या आणि परिवाराच्या आरोग्यासाठी आठवड्यातून एक दिवस ‘नो व्हेईकल डे’ पाळावा. त्यातून दुचाकी वाहनामुळे होणाऱ्या प्रदूषणावर आळा बसविणे शक्य आहे. परिणामी शहरातील नागरिकांना त्या दिवशी मोकळा श्वास घेता येईल. या अनुषंगाने ‘लोकमत’ने ‘इनिशिएटिव्ह’ घेत ‘व्हेईकल डे’बाबत लोकजागर केला. ही बाब वर्धेकरांच्या हृदयाला भिडली. यानंतर तब्बल ४६ सामाजिक संघटनांनी वर्धेत दर गुरुवारी ‘नो व्हेईकल’डे पाळण्याचा निर्धार केला. (प्रतिनिधी)
वर्धेत दर गुरुवार असणार ‘नो व्हेईकल डे’
By admin | Updated: December 25, 2015 04:21 IST