शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

कुंभारीत होणार काट्याची लढत

By admin | Updated: February 16, 2017 19:07 IST

कुंभारीत होणार काट्याची लढत

कुंभारीत होणार काट्याची लढतसोलापूर : आॅनलाईन लोकमतनेहमीच दुर्लक्षित राहिलेला कुंभारी जिल्हा परिषद गट यंदा प्रथमच चर्चेत आला आहे़ राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये आलेल्या सुरेश हसापुरे यांच्या उमेदवारीने निवडणुकीला महत्त्व आले आहे़ विकासकामांपेक्षा जातीय समीकरणे, स्थानिक आणि उपरा उमेदवार याच मुद्द्यावर प्रचाराचा अधिक भर दिसून येतो़अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या कुंभारी गटाच्या राजकारणावर अक्कलकोटच्या नेतेमंडळींचा प्रभाव अधिक आहे़ आ़ सिद्धाराम म्हेत्रे यांच्याशी सलगी करून सुरेश हसापुरे यांनी उमेदवारी पक्की केली तर सचिन कल्याणशेट्टी यांनी त्यांना शह देण्यासाठी आणप्पा बाराचारे यांना भाजपकडून रिंगणात उतरवले आहे़ हसापुरे - बाराचारे यांच्यातील ही लढाई आ़ म्हेत्रे - सचिन कल्याणशेट्टी यांच्या विधानसभा निवडणुकीचा ‘ट्रेलर’ ठरणार आहे़ पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत एकाकी लढत देत भाजपच्या सागर तेलीने तगडा उमेदवार शिवानंद आंदोडगी यांना पराभूत केले होते़ आंदोडगी हे हसापुरे यांचे समर्थक होते. त्याचीच पुनरावृत्ती करण्यासाठी भाजप कार्यकर्ते कामाला लागले आहेत़लिंगायत, धनगर समाजाचे प्राबल्य या गटावर आहे़ भाजपने कुंभारी गटात धनगर समाजाचे आणप्पा बाराचारे, कुंभारी गणात ताराबाई शिरीष पाटील यांना रिंगणात उतरवून दोन्ही समाजात समन्वय साधला आहे़ काँग्रेसची भिस्त केवळ लिंगायत समाजावर आहे़ सुरेश हसापुरे जि़ प़ गटातून तर पं़ स़ मध्ये मीनाक्षी बिराजदार दोघेही लिंगायत आहेत़ धोत्री, दर्गनहळ्ळी, कर्देहळ्ळी, वडगाव-शिरपनहळ्ळी या गावातील मतविभागणीवर धोत्री गावच्या काँग्रेसच्या उमेदवार जिजाबाई शिंदे, भाजपच्या रेखा नवगिरे यांची भिस्त आहे़ या गटात आण्णाराव पाटील राष्ट्रवादी, गेनसिद्ध खांडेकर शिवसेना, अशोक ढोणे अपक्ष रिंगणात आहेत़---------------------------स्थानिक आणि उपरागेली अनेक वर्षे कुंभारी गटात काँग्रेसकडून बाहेरचा उमेदवार लादला जातो़ स्थानिकांना डावलल्याची भावना मतदारात आहे़ कै़उमाकांत राठोड, कै़ बसवेश्वर नरोळे, नळपती बनसोडे, कमल कमळे, लक्ष्मण गोतसुर्वे यांना काँग्रेसने लादले होते़ भाजपने याच मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले आहे़ ‘आपले गाव आपला उमेदवार’ हे घोषवाक्य घेऊन तरुण प्रचारात उतरले आहेत़ भाजपने स्थानिक उमेदवार दिला आहे़--------------------------दावे-प्रतिदावेगेल्या तीन वर्षात कुंभारीसाठी कोट्यवधींचा निधी आणल्याचा दावा काँग्रेसचे सुरेश हसापुरे करीत आहेत़ तीर्थक्षेत्र विकास निधीशी हसापुरे यांचा काय संबंध असा सवाल भाजपकडून केला जात आहे़ या उलट पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी ९ कोटींचे रस्ते मंजूर केल्याचा दावा भाजपचे सागर तेली यांनी केला़ दीड वर्षात आणप्पा बाराचारे यांनी स्वत:च्या खर्चातून कुंभारीत पाणीपुरवठा केल्याचे सांगितले जाते़ आ़ सिद्धाराम म्हेत्रे यांचे नेतृत्व ही काँग्रेसची जमेची बाजू आहे तर तरुणांची मजबूत फळी यावर भाजपची मदार आहे़-----------------------दृष्टिक्षेपात कुंभारी गटमतदारसंख्या - १८,८१६स्त्री - ८,६३६पुरूष - १०,१८०कुंभारी गण - ६२६४ मतदारधोत्री गण - १२,५५२ - मतदारसमाविष्ट गावे - कुंभारी, कर्देहळ्ळी, धोत्री, दर्गनहळ्ळी, वडगाव-शिरपनहळ्ळी, उमेदवार - कुंभारी गट - ५, कुंभारी गण - ५धोत्री गण - ३