शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

गोटमारी यात्रेत दोन गावांमध्ये होते दगडफेक; अंधश्रद्धेतून गेला तरुणाचा बळी, २२६ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 06:11 IST

मध्य प्रदेशातील जांब नदीपात्रात भरलेल्या गोटमार यात्रेत पांढुर्णा व सावरगाव येथील नागरिकांत झालेल्या गोटमारीत शंकर भलावी (२५, रा. भुयारी, जि. छिंदवाडा) या तरुणाचा मृत्यू झाला.

- संजय खासबागे वरुड (अमरावती) : येथून ३५ किमी अंतरावर असलेल्या मध्य प्रदेशातील जांब नदीपात्रात भरलेल्या गोटमार यात्रेत पांढुर्णा व सावरगाव येथील नागरिकांत झालेल्या गोटमारीत शंकर भलावी (२५, रा. भुयारी, जि. छिंदवाडा) या तरुणाचा मृत्यू झाला. २२६ जण जखमी झाले. तीनशे वर्षांची ही कुप्रथा बंद करण्यात अपयश येत असल्याने अंधश्रद्धेमुळे यंदाही बळी गेला. या यात्रेत ७१ वर्षांत १२ जण मृत्युमुखी पडले असून हजारो नागरिकांना अपंगत्व आले आहे.सावरगाव येथील युवतीसोबत पांढुर्णा येथील युवकाचे प्रेमसूत जुळले होते. ते विवाहबंधनात अडकणार तेवढ्यात मान-प्रतिष्ठेचा अडथळा निर्माण झाल्याने युवतीला सावरगावातून पांढुर्णा येथे नेत असताना दोन्ही गावांतील लोकांनी त्यांना जांब नदीपात्रात हेरून त्यांच्यावर दोन्हीकडून दगडांचा वर्षाव केला. त्यात दोघे दगावले. चंडिकामातेच्या मंदिरात पूजाअर्चा करून प्रेमीयुगुलाला समाधी देण्यात आली. ही घटना पोळ्याची करीला घडल्याने या दिवशी दोन्ही गावांतील लोक या नदीत गोटमार यात्रा भरवत असल्याची आख्यायिका आहे. दोन्ही आख्यायिका येथील नागरिक श्रद्धेने जोपासतात. या यात्रेत २२६ जखमी झाल्याचे आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आले.>कुप्रथा बंद करण्यात अपयशमध्य प्रदेश प्रशासनाने ही यात्रा बंद करण्याकरिता केलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. या वर्षीसुद्धा पोळ्याच्या करीला विधिवत पळसाचे झाड लावून पूजाअर्चा झाल्यानंतर यात्रा सुरू झाली. त्यानंतर दोन्ही बाजंूकडून एकच दगडांचा वर्षाव सुरू झाला.दगड वर्मावर लागल्याने शंकर भलावीचा बळी गेला. यात जे २२६ जण जखमी झाले ते श्रद्धेचे प्रतीक मानले जाते. जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.