मुंबई : उद्धव ठाकरे यांनी पक्षाची धुरा हाती घेतल्यानंतरही मी केवळ बाळासाहेबांशीच चर्चा करायचो, अशी साक्ष शिवसेना नेते अनिल परब यांनी उच्च न्यायालयात दिली. बाळासाहेबांच्या मृत्युपत्रावरून उद्धव व जयदेवमध्ये जुंपली आहे. याची सुनावणी सध्या न्या. गौतम पटेल यांच्यासमोर सुरू आहे. परब म्हणाले, की मला मातोश्री बंगल्यावर थेट प्रवेश होता. मला बंगल्यात घेण्यासाठी बाळासाहेब स्वत: काही वेळा प्रवेशद्वाराजवळ येत होते. पक्षाच्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर मी थेट त्यांच्याशीच चर्चा करायचो. २००३मध्ये उद्धवने शिवसेनेची सूत्रे हाती घेतल्यानंतरही माझा संवाद बाळासाहेबांशीच होत होता, असे परब यांनी न्यायालयाला सांगितले. यावरील पुढील सुनावणी १९ आॅगस्टला होणार आहे.
बाळासाहेबांशीच थेट संवाद होता - अनिल परब यांची हायकोर्टात साक्ष
By admin | Updated: July 1, 2015 00:33 IST