शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचारमुक्तीसाठी नोटाबंदी आवश्यकच

By admin | Updated: January 16, 2017 04:24 IST

भारताचा भ्रष्टाचारात १३८ देशांत ७६ वा क्रमांक लागतो. आपल्यापेक्षा ७५ देश कमी भ्रष्टाचारी आहेत.

डोंबिवली : भारताचा भ्रष्टाचारात १३८ देशांत ७६ वा क्रमांक लागतो. आपल्यापेक्षा ७५ देश कमी भ्रष्टाचारी आहेत. भ्रष्टाचारामुळे समाजाची भीषण अवस्था झालेली आहे. भ्रष्टाचाराने संपूर्ण देशाला पोखरून टाकले आहे. १३० कोटी लोकसंख्येमध्ये ६५ टक्के जनता तरुण आहे. यासाठी सव्वा ते दीड कोटी रोजगार निर्माण होण्याची गरज आहे. देश भ्रष्टाचारमुक्त झाला नाही, तर रोजगार निर्माण करणे, उद्योजक तयार करणे कठीण जाईल. भ्रष्टाचारमुक्तीसाठी नोटाबंदी होणे गरजेचे आहे, असे मत अर्थतज्ज्ञ अभिजित फडणीस यांनी व्यक्त केले. ‘राष्ट्रीय शिक्षण संस्था, डोंबिवली’च्या स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे पहिले पुष्प फडणीस यांनी गुंफले. या वेळी ते बोलत होते. ‘जागतिक अर्थकारण आणि भारत’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर संस्थाध्यक्षा सुलभा डोंगरे, कार्यवाह संजय कुलकर्णी उपस्थित होते. फडणीस म्हणाले की, पायाभूत साधने असतील, तरच आपण जगाशी लढू शकतो. सोने, जागेमध्ये केलेली गुंतवणूक ही काढून घेऊन तोच पैसा, व्यापारवृद्धीसाठी गुंतवणूक करणे, ही काळाची गरज आहे. त्यानुसार, सध्याचे सरकार कार्य करीत आहे. याचाच परिणाम म्हणून सरकारने कारखान्यांवरील कर कमी केले आहेत. रासायनिक द्रव्यांचा वापर यामुळे जमिनीचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहे. शेतकरी हळूहळू देशात नैसर्गिक व जैविक शेतीकडे वळत आहे. जर्सी गायी हे एक मोठे संकट आले आहे. पुन्हा देशी गायीकडे वळण्याची गरज आहे. तरच, शेतकरी समृद्ध होईल. त्यासाठी आपण हातभार लावला पाहिजे. भारत हा इतर देशांच्या तुलनेत बुद्धिमान देश असल्याने मिळालेल्या संधीचे सोने करतो. नव्या अर्थव्यवस्थेकडे भारताची वाटचाल सुरू आहे. आर्थिक व्यवहारही बोटांच्या ठशांच्या साहाय्याने होणार आहेत.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे कार्यवाह संजय कुलकर्णी, पाहुण्यांचा परिचय आनंद रानडे, सूत्रसंचालन नयना पाटील यांनी केले. (प्रतिनिधी)>व्याजदर आणखी कमी होणारनोटाबंदीनंतर व्याजदर कमी झाले आहेत. हे व्याजदर येणाऱ्या काळात आणखी कमी होतील. जगातील अनेक देशांत उणे व्याजदर आहेत. ही संकल्पना न रुचणारी आहे. काही देश तर आपले पैसे सांभाळण्यासाठी पैसे मोजतात. वेगळ्या वाटेकडे आपला देश जाणार आहे. भ्रष्टाचार, महागाई, काळी अर्थव्यवस्था कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. तसेच मानवी संसाधनांचा पूर्ण वापर करावा लागणार आहे.