नाशिक : मुस्लीम समाजाच्या उपवासाचा (रोजा) पवित्र महिना रमजान पर्वाला येत्या शुक्रवारी संध्याकाळपासून प्रारंभ होणार आहे. बुधवारी (दि.१६) संध्याकाळी चंद्रदर्शन घडण्याची शक्यता होती;मात्र राज्यासह नाशिक शहरासह जिल्ह्यात कोठेही चंद्रदर्शन घडल्याची ग्वाही राज्य चांद समिती व नाशिक विभागीय चांद समितीला प्राप्त होऊ शकली नाही.इस्लामी कालगणनेतील चालू उर्दू महिना ‘शाबान’ची बुधवारी २९ तारीख असल्याने, संध्याकाळी चंद्रदर्शनाची दाट शक्यता वर्तविली जात होती. बुधवारी चंद्रदर्शन घडले नाही. त्यामुळे चालू उर्दू महिन्याचे तीस दिवस पूर्ण करून शुक्रवारपासून रमजानची सुरुवात करण्यात येईल. गुरूवारी संध्याकाळी सुर्यास्तानंतर येणारी रात्र ही रमजान पर्वाची पहिली रात्र असणार आहे, त्यामुळे ‘तरावीह’च्या विशेष नमाजपठणाला उद्या रात्रीपासून सर्व मशिदींमध्ये प्रारंभ करण्यात येणार आहे. तसेच शुक्रवारी पहाटे मुस्लीम बांधव अल्पोहार घेत रमजान पर्वाची पहिली ‘सहेरी’ करुन उपवास (रोजा) करतील. सहेरीची समाप्तीची वेळ ४ वाजून ३३ मिनिट अशी आहे. नाशिकमधील शाही मशिदीत शहरातील विविध धर्मगुरुंच्या उपस्थितीत चांद समितीची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत रमजान पर्वाबाबत अंतीम निर्णय धर्मगुरूंकडून घेण्यात आला.
राज्यात कोठेही चंद्रदर्शन नाही : रमजान पर्व येत्या शुक्रवारपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 20:54 IST
इस्लामी कालगणनेतील चालू उर्दू महिना ‘शाबान’ची बुधवारी २९ तारीख असल्याने, संध्याकाळी चंद्रदर्शनाची दाट शक्यता वर्तविली जात होती. बुधवारी चंद्रदर्शन घडले नाही. त्यामुळे चालू उर्दू महिन्याचे तीस दिवस पूर्ण करून शुक्रवारपासून रमजानची सुरुवात करण्यात येईल.
राज्यात कोठेही चंद्रदर्शन नाही : रमजान पर्व येत्या शुक्रवारपासून
ठळक मुद्दे शुक्रवारपासून रमजानची सुरुवात ‘तरावीह’च्या विशेष नमाजपठणाला उद्या रात्रीपासून सर्व मशिदींमध्ये प्रारंभ राज्यासह नाशिक जिल्ह्यात कोठेही चंद्रदर्शन घडल्याची ग्वाही प्राप्त होऊ शकली नाही.