शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
3
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
4
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
5
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
6
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
7
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
8
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
9
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
10
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
11
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
12
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
13
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
14
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
15
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
16
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
17
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
18
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
19
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
20
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप

बाळासाहेबांसारखा दरारा असलेला नेताच नाही - उद्धव यांचा मोदींना टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2017 22:46 IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा दरारा असलेला दुसरा नेता नाही असे उद्गार उद्धव यांनी स्मारक लोकार्पण कार्यक्रमादरम्यान काढले.

ऑनलाइन लोकमत

कल्याण, दि. ७ -   ‘गर्व से कहो हम हिंदू है’, असे छातीठोकपणे म्हणणारा, बाबरी मशीद पाडल्यावर मुंबईतील दंगल शांत करणारा, असा दरारा आणि दम असलेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याखेरीज दुसरा अन्य कुठलाही नेता देशात झालेला नाही, असे उद्गार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. कल्याण-डोंबिवली महापालिकेने काळा तलाव येथे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा २२ फुटांचा पुतळा उभारला आहे. शनिवारी संध्याकाळी उद्धव ठाकरेंच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आदी यावेळी उपस्थित होते. बाळासाहेबांच्या या स्मारकाच्या लोकार्पणामुळे गेले आठवडाभर कल्याणमध्ये जल्लोषाचे वातावरण होते. कोल्हापूरहून सोमवारी बाळासाहेबांच्या 22 फुटी भव्य पूर्णाकृती शिल्पाचे वाजतगाजत, ढोल ताशांच्या गजरात कल्याण नगरीत आगमन झाले होते. तेव्हापासूनच कल्याण नगरी या स्मारकाच्या लोकार्पणसाठी सजू लागली होती.

बाळासाहेब हे देशव्यापी व्यक्तिमत्व

बाळासाहेब देशव्यापी व्यक्तिमत्व व्हावे यासाठी ठिकठिकाणी त्यांचे स्मारक होणे गरजेचे आहे. बाळासाहेबांनी कधीही स्वत: शस्त्र वापरले नाही. पण, त्यांच्या कुंचल्यांचे फटकारे हेच शस्त्र होते. त्याने भलेभले घायाळ होत होते. प्रख्यात चित्रकार डेव्हिड लो यांना बाळासाहेब गुरुस्थानी मानत होते. लो यांना हिटलर घाबरत होता, तर बाळासाहेबांना सर्व जण घाबरत होते. अशी दहशत म्हणा की दरारा, दम असलेले ते एकमेव व्यक्तिमत्व होते. १९९२-९३ मध्ये मुंबईत जातीय दंगली झाल्या, तेव्हा बाळासाहेबच त्या दंगली शांत करू शकले. मुंबईत बसून त्यांनी अमरनाथ यात्रा सुरू करून दाखवली. पाकिस्तानी अधिकारी मुंबईत आल्यावर बाळासाहेबांची भेट घेतल्याखेरीज त्यांची भारतभेट पूर्ण होत नव्हती. कल्याणने बाळासाहेबांचे भव्य स्मारक उभे केले. कल्याणकरांच्या ऋणातून ठाकरे कुटुंबीय उतराई होऊ शकत नाही, असे नमूद करून ठाकरे म्हणाले की, बाळासाहेबांचे स्मारक उभे करण्याच्या स्पर्धेत कल्याण-डोंबिवलीकर हे मुंबईकरांच्या पुढे गेले आहेत. हे आव्हान स्वीकारून असेच भव्यदिव्य स्मारक मुंबईत करून दाखवू. आता महापौर देवळेकर यांनी कल्याणच्या आरमाराची प्रतिकृती उभी करण्याचे काम हाती घ्यावे, असे त्यांनी सुचवले.

 

आम्ही काळ्याचे भगवे करून दाखवले, भाजपाला टोला

 देशात काळ्याचे पांढरे करणे सुरू असताना आम्ही काळ्याचे (काळातलाव) भगवे करून दाखवले, असा टोला उद्धव यांनी राज्यमंत्री चव्हाण यांच्याकडे पाहत लगावला.  यावेळी उद्धव यांनी  निवडणूक आयोगाचे आभार मानले. मागील वेळी कल्याणमध्ये स्वच्छता मोहिमेकरिता आलो, तेव्हा आचारसंहिता लागू होती, तर आज पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याकरिता आलो, तरीही निवडणूक आचारसंहिता लागू आहे. या कार्यक्रमाला निवडणूक आयोगाने अनुमती दिली, त्याबद्दल उद्धव यांनी आयोगाचे आभार मानले.

बाळासाहेबांच्याच आदेशाने 2009 साली तत्कालीन आमदार आणि विद्यमान पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य पदाधिकारी व शिवसैनिकांनी भगवा तलावाचे सुशोभीकरण केले होते. आज या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक, म्युझिकल फाऊंटन, ओपन जिम आदी सुविधा विकसित करण्यात आल्या असून कल्याण डोंबिवली परिसरातील हजारो नागरिकांसाठी दोन घटका विरंगुळ्याचे हक्काचे ठिकाण उपलब्ध झाले आहे.
 
भगवा तलाव परिसरातच प्रबोधनकार ठाकरे यांचे काही काळ वास्तव्य होते. त्यामुळे बाळासाहेबांना या तलावाविषयी विशेष जिव्हाळा आहे. त्यामुळेच याच परिसरात बाळासाहेबांचे देखणे स्मारक उभारण्याचा निर्णय 2013 साली महापालिकेने घेतला आणि गेल्या दोन - अडीच वर्षांमध्ये या ठिकाणी देखणे स्मारक विकासित झाले आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील हे पहिले स्मारक ठाणे जिल्ह्यात झाल्याचे समाधान असल्याची भावना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
या ठिकाणी संजय सुरे, संताजी चौगुले आदींनी घडवलेला बाळासाहेबांचा 22 फुटी ब्रॉन्झचा भव्य पूर्णाकृती पुतळा असून बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांचं प्रदर्शन, आर्ट गॅलरी, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं दालन, नवोदित चित्रकारांना चित्र काढण्यासाठी दालन, बाळासाहेबांची भाषणे दृक्श्राव्य माध्यमातून ऐकण्याची सोय अशा अनेक सुविधा याठिकाणी विकसित करण्यात आल्या आहेत. शिवाय, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बाळासाहेबांची प्रतिमा प्रत्यक्ष पाहण्याची सोय देखील याठिकाणी करण्यात आली आहे.