शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीबाबत पूर्ण समाधानी नाही

By admin | Updated: June 26, 2017 02:31 IST

कर्जमाफीच्या मुद्यावर आम्ही सरकारला सहकार्य करण्यास तयार आहोत, पण सरकारने शेतकऱ्यांच्या इतर मागण्या मान्य कराव्यात

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : कर्जमाफीच्या मुद्यावर आम्ही सरकारला सहकार्य करण्यास तयार आहोत, पण सरकारने शेतकऱ्यांच्या इतर मागण्या मान्य कराव्यात, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले. शेतमालाच्या हमीभावाबाबत स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी तातडीने करावी, अशी मागणीही पवार यांनी या वेळी केली. पवार म्हणाले, सत्तेवर येण्यापूर्वी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन भाजपाने दिले होते, त्याचे पालन त्यांनी करावे. उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा या सूत्रानुसार शेतमालाचे हमीभाव ठरवून द्यावेत अशी शिफारस स्वामीनाथन कमिटीने केलेली आहे. शेतकऱ्यांना हमीभाव मिळाल्यास तो थकबाकीदार राहणार नाही. त्याचबरोबर शासनाने अद्याप कृषीमूल्य आयोगही नेमलेला नाही, तो तातडीने नेमावा. शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीमुळे नियमित कर्ज फेडणारा एक शेतकरी वर्गही नाराज झाला आहे. आम्ही कर्ज फेडून चूक केली का अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. त्यामुळे नियमित कर्ज फेडणाऱ्यांनाही सवलती शासनाने द्याव्यात. राज्यात कांद्याचे भाव पडले आहेत, कांदा निर्यातीला परवानगी द्यावी, त्यासाठी शासनाने अनुदान द्यावे. शासनाने तूर खरेदी बंद केली आहे. त्यामुळे मराठवाडा व खान्देशातील शेतकरी हवालदिल झाला आहे. तूर खरेदी पुन्हा सुरू करावी. तसेच तुरीची निर्यात करण्यासाठीही अनुदान उपलब्ध करून द्यावे अशी मागणी पवार यांनी केली. मला जातीयवादी ठरविणाऱ्यांची खदखद बाहेर आली-इतिहास संशोधकांनी मांडलेल्या तथ्याच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराजांना ‘गो ब्राम्हण प्रतिपालक’ ठरविणे चुकीचे असल्याचे मत मी मांडले होते. त्यामुळे त्याबाबत कोण काय म्हणतो त्याला मी किंमत देत नाही. माझ्यावर जातीयवादाचा आरोप करणाऱ्यांची खदखद त्यातून बाहेर पडत असल्याची टीका पवार यांनी केली. मीरा कुमार योग्य उमेदवारराष्ट्रपतीपदासाठी यूपीएकडून उमेदवारी देण्यात आलेल्या मीरा कुमार यांनी सात देशांमध्ये राजदूत म्हणून भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. केंद्रीय कॅबिनेट व संसदेत काम करण्याचा त्यांना अनुभव आहे. त्यांचा आंतरराष्ट्रीय प्रश्नांचा अभ्यासही चांगला आहे. त्यामुळे त्या योग्य उमेदवार असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.