शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे उपशिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई नाहीच

By admin | Updated: April 20, 2015 02:53 IST

ठाण्याचे माध्यमिक उपशिक्षणाधिकारी अशोक मिसाळ यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक नियमबाह्य कामे केल्याने विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई यांनी

मुंबई : ठाण्याचे माध्यमिक उपशिक्षणाधिकारी अशोक मिसाळ यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक नियमबाह्य कामे केल्याने विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई यांनी त्यांना दोषी ठरविले आहे. मिसाळ यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील शैक्षणिक प्रशासन बिघडल्याचा ठपका शिक्षण संचालकांनी गेल्या वर्षी ठेवला होता. त्यानंतर अद्यापर्यंत मिसाळ यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने शिक्षण क्षेत्रात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.मिसाळ यांची २0११मध्ये ठाणे जिल्हा परिषदेच्या उपशिक्षणाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली. याचदरम्यान त्यांच्याकडे प्रभारी शिक्षणाधिकारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या पदावर कार्यरत असताना त्यांनी शिक्षकांच्या नियमबाह्य नेमणुका केल्याचे चौकशीअंती स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मिसाळ यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस शिक्षण संचालकांनी शासनाकडे केलेली आहे.विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई यांनी मिसाळ दोषी ठरविले आहे. तरीही उपसंचालकांनी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केलेली नाही. मिसाळ हे गेल्या ४ वर्षांपासून या कार्यालयात कार्यरत आहेत. विविध तक्रारी आल्यानंतर मिसाळ हे प्रशासकीय कामकाज करण्यासाठी सक्षम नसल्याचा शेरा शिक्षण संचालकांनी मारला होता. दरम्यान, शिक्षण संचालकांनी दोषी ठरविल्यानंतरही अद्यापपर्यंत मिसाळ यांच्यावर कारवाई झाली नसल्याने शिक्षण क्षेत्रात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. याबाबत शिक्षण संचालक सर्जेराव जाधव यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)