शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

BREAKING: वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे; 'महावितरण'च्या खासगीकरणाचा विचारच नाही, देवेंद्र फडणवीसांनी दिला शब्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2023 16:33 IST

काल रात्रीपासून आपल्या विजेच्या तिन्ही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी काही मागण्यांसंदर्भात संप सुरू केला होता. यात कंत्राटी कर्मचारी संघटनेचाही समावेश होता. यावेळी तीनचार मुद्द्यांवर अत्यंत सकारात्मक चर्चा झाली आहे. 

महावितरणचे खासगीकरण थांबवण्यात यावे. या मागणीसाठी पुकारलेला संप महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी मागे घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संपकऱ्यांच्या शिष्टमंडळाच्या झालेल्या बैठकीनंतर हा संप मागे घेण्यात आला आहे. एकूण ३२ कर्मचारी संघटना या संपात सामील झाल्या होत्या. या सर्वच्या  सर्व संघटनांच्या प्रतिनिधींसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले. 

यासंदर्भात बोलताना, काल रात्रीपासून आपल्या विजेच्या तिन्ही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी काही मागण्यांसंदर्भात संप सुरू केला होता. यात कंत्राटी कर्मचारी संघटनेचाही समावेश होता. यावेळी तीन-चार मुद्द्यांवर अत्यंत सकारात्मक चर्चा झाली. राज्य सरकारला या कंपन्यांचे कुठलेही खासगीकरण करायचे नाही. या उलट पुढील तीन वर्षांत या तीन कंपन्यांमध्यये ५० हजार कोटींची गुंतवणूक राज्य सरकार स्वतः करणार आहे. यामुळे आपले अॅसेट्स कुणाला देण्याचा अथवा अशा प्रकारे त्याचे खासगीकरण करण्याचा कुठलाही विचार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

फडणवीस म्हणाले, खरे तर, हा संप झाला तो म्हणजे पॅरलल लायसन्सिंगसंदर्भात. विजेच्या कायद्यात पॅरलल लायसन्सिंगची एक व्यवस्था आहे. यासंदर्भात MERC कडे नुकतेच एका खासगी कंपनीने प्रायव्हेट लायसंन्सिंगसाठी अर्ज दाखल केला आहे. यासंदर्भात, या सर्वच संघटनांचे म्हणणे होते की, महाराष्ट्र सरकारच्या कंपन्यांनी यासंदर्भात कंटेस्ट करणे आवश्यक होते. कारण पॅरलल लायसन्स आल्यानंतर, त्याचा परिणाम आपल्या कंपन्यांवर होऊ शकतो. मात्र, यासंदर्भात मी त्यांना (संपकऱ्यांना) आश्वस्त केले आहे, की आता जे नोटिफिकेशन काढले होते, ते त्या खासगी कंपनीने काढलेले नोटिफिकेशन आहे. आताची जी स्टेज आहे. त्या स्टेजला MERC यासंदर्भातील नोटिफिकेशन काढेल. यानंतर, त्यासंदर्भात ऑब्जेक्शन घेऊ आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होमार आहे? त्यामुळे काय नुकसान होणार आहे? यासंदर्भात आपली सर्व भूमिका मांडली जाईल.

याशिवाय, या कायद्यातील सर्व आयुधांचा वापर करून आपल्या कंपनीच्या हितासाठी MERC चा निर्णय व्हायला हवा यासाठी पुढाकार कंपनीच्या माध्यमाने आणि राज्यसरकारच्या माध्यमाने घेतला जाईल, असे आश्वासनही फडणवीस यांनी यावेळी दिले.कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी खास घोषणा -याचबरोबर कंत्राटी कामगारांसंदर्भात त्यांना अॅडीशनल मार्क देऊन येणाऱ्या भरती प्रक्रियेत स्पेशल केस म्हणून राज्य सरकार वयात रिलॅक्सेशल देऊन त्यांचा समावेश सेवेत कसा करून घेता येईल याला आपण प्राधान्य देणार आहोत, असे आश्वासनही फडणवीस यांनी यावेळी दिले आहे. 

 

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाState Governmentराज्य सरकारelectricityवीज