शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात उदंड झाली फार्मसी कॉलेज, १० महाविद्यालयांमध्ये शून्य प्रवेश; रिक्त जागांमधील वाढ चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 06:21 IST

७१ कॉलेजांत २०हून कमी विद्यार्थी, नवीन कॉलेजांना देण्यात येणारी परवानगी ही चिंतेची बाब आहे. हे थांबवले नाही तर भविष्यात फार्मसी क्षेत्रात बेरोजगारीची समस्या गंभीर रूप धारण करू शकते. 

अमर शैलामुंबई : राज्यात फार्मसी कॉलेजांच्या संख्येत मोठी वाढ असून अनेक ठिकाणी जागा रिक्त राहिल्याने चिंताजनक परिस्थिती उद्भवली आहे. यंदा १० कॉलेजांमध्ये एकाही विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला नाही, तर ३७ महाविद्यालयांना १० पेक्षा कमी विद्यार्थी मिळाले आहेत. तसेच ७१ कॉलेजांमध्ये २० पेक्षा कमी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. सीईटी सेलकडून मिळालेल्या आकडेवारीतून ही बाब स्पष्ट झाली आहे. 

जागांची मागणी आणि महाविद्यालयांची संख्या यांतील संतुलन बिघडल्यामुळे  भविष्यात या क्षेत्रात बेरोजगारीची समस्या निर्माण होऊ शकते. तसेच अनेक कॉलेजांना पुरेशा विद्यार्थी संख्येअभावी खर्च भागविणे अवघड जाणार असून, त्याचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर होऊ शकतो, असा या क्षेत्रातील तज्ज्ञांचा अंदाज आहे. 

सन २०२२ मध्ये बी. फार्मसीची ३९६ महाविद्यालये होती. केवळ चार वर्षांत त्यांची संख्या १३५ ने वाढून ५३१ वर गेली. परिणामी, जागांमध्येही मोठी वाढ झाली. २०२२ मध्ये ३६,८८८ जागा होत्या. त्यांची संख्या यंदा ४८,८७८वर पोहोचली. २०२२ मध्ये ३२,१३७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते, तर यंदा हीच संख्या ३२,९५१ एवढी आहे. फार्मसी अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांची मागणी फारशी वाढली नसतानाही मोठ्या संख्येने कॉलेजांना  परवानगी मात्र देण्यात आली. 

१०० टक्के जागा भरलेली केवळ १८ महाविद्यालये बी.फार्मसीच्या केवळ १८ कॉलेजांतील १०० टक्के जागा भरल्या आहेत, तर ९० टक्क्यांहून अधिक जागा भरलेली १४८ महाविद्यालये आहेत. या १४८ कॉलेजांमध्ये  १३,७१५ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. 

अशी आहेत शून्य प्रवेश झालेली कॉलेजेस वर्धमान कॉलेज, कारंजा (लाड), वाशिमसंत गजानन महाराज कॉलेज, चंद्रपूरस्व. हर्षवर्धन हुमने कॉलेज, भंडाराराजश्री शाहू महाराज कॉलेज, गोंदियाओएसिस कॉलेज, भोजपूर, भंडारारत्नदीप फार्मसी कॉलेज, रत्नापूर, अहिल्यानगरजे.एम. कोलपे कॉलेज, अहिल्यानगरलेट नारायणदास भवनदास छबडा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, सातारारियाजभाई शमनजी कॉलेज, गडहिंग्लज, कोल्हापूरपद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी कॉलेज, वाळवा, सांगली.

अन्यथा बेरोजगारीची समस्या गंभीर वळणावर  नवीन कॉलेजांना देण्यात येणारी परवानगी ही चिंतेची बाब आहे. हे थांबवले नाही तर भविष्यात फार्मसी क्षेत्रात बेरोजगारीची समस्या गंभीर रूप धारण करू शकते. सरकार, विद्यापीठ आणि तंत्रशिक्षण विभागाने तातडीने हस्तक्षेप करून मागणी-पुरवठा संतुलित ठेवण्यासाठी ठोस धोरण आखावे, अशी सूचना ‘इंडियन फार्मास्यूटिकल काँग्रेस एसोसिएशन’चे अध्यक्ष प्रा. मिलिंद उमेकर यांनी केली आहे.  

राज्यात फार्मसी कॉलेजांचे आलेले पीक आणि केंद्रिकृत प्रवेश प्रक्रियेतील विलंबामुळे विद्यार्थी फार्मसीपासून दूर जात आहेत. ही परिस्थिती शिक्षणाच्या गुणवत्तेला गंभीर धोका निर्माण करणारी आहे. - प्रा. मिलिंद उमेकर, अध्यक्ष, इंडियन फार्मास्युटिकल कांग्रेस असोसिएशन

English
हिंदी सारांश
Web Title : Pharmacy College Boom in Maharashtra, Vacant Seats Cause Concern

Web Summary : Maharashtra's pharmacy college surge faces a crisis with numerous vacant seats. Ten colleges saw zero admissions, raising concerns about future unemployment and compromised educational quality, demanding immediate policy intervention.
टॅग्स :collegeमहाविद्यालय