शहरं
Join us  
Trending Stories
1
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
2
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
3
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
4
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
5
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
6
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
7
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
8
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
9
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
10
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
11
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
12
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
13
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
14
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
15
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
16
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
17
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
18
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
20
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण

महाराष्ट्रात भ्रष्टांचे फावले

By admin | Updated: September 11, 2015 03:54 IST

महाराष्ट्रातील सरकारी यंत्रणेचा सुस्तपणा आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईची परवानगी देण्यास होणारा विलंब यामुळे राज्यातील अधिकाऱ्यांवरील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे थंडबस्त्यात

- शीलेश शर्मा,  नवी दिल्लीमहाराष्ट्रातील सरकारी यंत्रणेचा सुस्तपणा आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईची परवानगी देण्यास होणारा विलंब यामुळे राज्यातील अधिकाऱ्यांवरील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे थंडबस्त्यात पडली आहेत. मंजुरी मिळत नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) हात बांधले गेले आहेत. दुसरीकडे सरकारच्या या सुस्तीमुळे दोषी अधिकाऱ्यांचे मात्र चांगलेच फावले आहे.यासंदर्भात मिळालेल्या आकडेवारीनुसार राज्यातील १२९ अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी एसीबीने तीन महिन्यांपेक्षाही अधिक काळापासून संबंधित विभागांकडे परवानगी मागितली होती; परंतु ९० दिवस लोटून गेल्यानंतरही त्यांना ही परवानगी मिळालेली नाही. याशिवाय २७९ प्रकरणांमध्ये खटला भरणे अत्यावश्यक आहे; परंतु विभागाच्या परवानगीशिवाय खटला चालविणे तर सोडाच, कारवाईसुद्धा सुरूकरता येत नाही. भ्रष्ट अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकल्यानंतर आपल्याविरुद्ध कारवाईस परवानगी मिळू नये यासाठी स्वत:चे वजन वापरून संबंधित विभागात साटेलोटे करतात.या विभागांत अडकल्या फाईल्सज्या विभागांमध्ये या फाईल्स लटकल्या आहेत त्यात गृह (३५), महसूल (२१), नगररचना (१९), ग्रामविकास (५), शिक्षण (१४), सार्वजनिक बांधकाम (३), एमआयडीसी व एमएसीडीसीएल (प्रत्येकी ३), सार्वजनिक आरोग्य (४), अर्थ (६), वन (२), सिंचन (३) आणि आरटीओ (२) या विभागांचा समावेश आहे.