शहरं
Join us  
Trending Stories
1
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
2
...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
3
Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम
4
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
5
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
6
क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?
7
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
8
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
9
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
10
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
11
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
12
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
13
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
14
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
15
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
16
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
17
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
18
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
19
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
20
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!

डास पळविण्यासाठी प्यायल्या जातात दररोज १०० सिगारेट

By admin | Updated: August 9, 2016 01:56 IST

डास पळविण्यासाठी सामान्य माणूस दररोज १०० सिगारेट ओढण्याइतका धूर स्वत:च्या शरीरात घेत असल्याची धक्कादायक माहिती सर्वेक्षणातून उघड झाली आहे.

पुणे : डास पळविण्यासाठी सामान्य माणूस दररोज १०० सिगारेट ओढण्याइतका धूर स्वत:च्या शरीरात घेत असल्याची धक्कादायक माहिती सर्वेक्षणातून उघड झाली आहे. डास पळविणाऱ्या कॉईल जाळताना दरवाजे-खिडक्या बंद केल्यामुळे हा प्रकार घडतो. यामुळे काळा दमा हा आजार होण्याचे प्रमाण वाढत आहे. काळा दमा हा आजार अतिशय हलक्या पावलाने शरीरात प्रवेश करत असल्याने त्याच्या ९५ टक्के रुग्णांचे निदानच होत नसल्याचे चेस्ट रिसर्च फाउंडेशनतर्फे करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. घरातील विविध उपकरणांतून निघणारा धूर हा नकळत व्यक्तीच्या फुफ्फुसात गेल्याने फुफ्फुसाची श्वसन क्षमता कमीकमी होत जाते. असे वारंवार झाल्यास ही क्षमता खूपच खालावते आणि व्यक्तीला श्वसनास मोठ्या प्रमाणात त्रास होतो. डासांपासून बचाव करण्यासाठी घरात जाळली जाणारी कॉईल तसेच चूल, धूप किंवा देवापुढे लावली जाणारी अगरबत्ती यांचा धूर हा आरोग्यासाठी हानिकारक असतो. मात्र, याबाबत आपल्याकडे जागृती नसल्याने हा आजार झालेला लक्षात येत नसल्याचे चेस्ट रिसर्च फाउंडेशनचे संचालक डॉ. संदीप साळवी यांनी सांगितले. २०१०मध्ये महाराष्ट्र राज्यातर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार काळा दमा हे मृत्यूचे सर्वात महत्त्वाचे कारण असल्याचे आढळून आले होते. राज्यात सिगारेट ओढण्याचे प्रमाण केवळ १७ टक्के असूनही काळा दमा होणाऱ्यांची संख्या मोठी असल्याचे लक्षात आले आहे. (प्रतिनिधी)याबरोबरच पॅसिव्ह स्मोकींगमुळेही काळा दमा होण्याच्या प्रमाणात वाढ होते. सिगारेट ओढणाऱ्यांच्या घरातील अनेकांना अस्थमा किंवा दमा असल्याचे काही संशोधनातून समोर आले असल्याचेही डॉ. साळवी यांनी सांगितले. त्यामुळे क्षयरोगानंतर काळा दमा हे मृत्यूचे सर्वात मोठे कारण असल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबत घराघरांत जनजागृती होणे आवश्यक असून सरकारनेही त्यादृष्टीने काम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अन्यथा येत्या काळात हे कारण मृत्यूचे सर्वात मोठे कारण ठरण्याची शक्यता आहे. हा धूर अतिप्रमाणात शरीरात गेल्याने फुफ्फुसे निकामी होतात. एक व्यक्ती साधारणत: दिवसातूीन १० हजार लिटर हवा शरीरात घेते. यामध्ये वायू प्रदूषण, घरातील गोष्टींमुळे होणारे प्रदूषण, फटाके अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. यामध्ये फुफ्फुसांबरोबरच व्यक्तीचे हृदयही बाधित होते. त्यामुळे हृदयाचे विकार होण्याचीही शक्यता असते. संस्थेने केलेल्या आणखी एका सर्वेक्षणानुसार ६० टक्के लोक दारे-खिडक्या बंद करुन कॉईल जाळत असल्याने श्वसनामुळे व्यक्तीच्या शरीरात धूर जातो. यामुळे एका रात्रीत १०० सिगारेट इतका धूर शरीरात जातो.