शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

...तर पुन्हा लावावे लागतील मास्क, राज्य कोरोना कृती दल अध्यक्ष डॉ. ओक यांचे मत

By संतोष आंधळे | Updated: December 22, 2022 07:20 IST

चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांना पॉझिटिव्ह नमुन्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग करण्याचे आवाहन केले आहे.

मुंबई : चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी खबरदारीचा उपाय म्हणून सर्व राज्यांना पॉझिटिव्ह नमुन्यांचे जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सिक्वेन्सिंग) करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. लसीकरणाची आपल्याकडची स्थिती उत्तम आहे. मात्र, कोरोना विषाणूमध्ये झालेले जनुकीय बदल तपासून विषाणूचा काही नवीन उपप्रकार (व्हेरिएंट) निर्माण झाला आहे किंवा कसे, याचे परीक्षण सुरू आहे. नव्या उपप्रकाराची तीव्रता अधिक असल्यास कदाचित पुन्हा मास्क लावावे लागतील, अशी शक्यता राज्य कोरोना कृती दलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी व्यक्त केली आहे. 

डॉ. ओक पुढे म्हणाले की, आपल्याकडे लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. मात्र, चीनमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण सापडत आहेत. या पार्श्वभूमीवर आपण कोरोना रोखण्यासाठी उपयुक्त वर्तनाचे पालन करणे गरजेचे आहे. आपल्याकडे कोरोनाचा नवीन उपप्रकार सापडून रुग्णसंख्या वाढत असेल तर स्वसंरक्षणार्थ मास्क लावावा लागण्याची शक्यता आहे. 

आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, सद्य:स्थितीत राज्यभरात कोरोनाचे १३२ सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी ३६ रुग्ण मुंबईतील आहेत. आतापर्यंत ८१ लाख लोकांना कोरोनाची बाधा झाली.  आता कोरोनाचा संसर्ग दर कमालीचा घटला असून रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्यामुळे निर्बंधमुक्ती करण्यात आली आहे. परंतु चीनमधील कहरामुळे केंद्रीय आरोग्य यंत्रणांनी सर्वांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

लसीची उपयुक्तता आणि परिणामकारकता  एका वरिष्ठ डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना प्रतिबंधक लसींची उपयुक्तता दिसून येत असली तरी ती किती काळ परिणामकारक राहील, हे स्पष्ट नाही. कारण कोरोना संपूर्ण जगासाठीच नवीन आहे. त्यावरील  लस बाजारात येऊन दोनच वर्षे झाली आहेत. लसीची परिणामकारकता शोधण्याबाबत अनेकदा सिरो सर्व्हे करण्यात आले आहेत. त्यात लसीमुळे लोकांमध्ये कोरोनारोधक प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) तयार झाली आहेत किंवा कसे, याची माहिती मिळते.  मुंबई महापालिकेतर्फे ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात सिरो सर्व्हे करण्यात आला असून त्याचे अहवाल नजीकच्या काळात प्राप्त होणार आहेत.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन