शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

तर ‘त्या’ तंत्रनिकेतनचे अभ्यासक्रम बंद होणार; राज्याच्या तंत्रशिक्षण सचिवांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 18:24 IST

३० टक्क्यांपेक्षा कमी प्रवेशाची अट लागू

अमरावती : राज्यात शासकीय तंत्रनिकेतमध्ये सलग तीन वर्षांपासून ३० टक्क््यांपेक्षा कमी प्रवेश असलेले अभ्यासक्रम बंद करण्याचे प्रस्ताव पाठवा, असे आदेश तंत्रशिक्षण सचिवांनी प्राचार्यांना दिले आहे. त्यामुळे शासकीय तंत्रनिकेतनच्या प्रवेशाची तपासणी युद्धस्तरावर सुरू झाली आहे.

दहावीच्या पात्रतेवर अभियांत्रिकीचे पदविका शिक्षण देणारे शासकीय अथवा खासगी तंत्रनिकेतनमधील प्रवेशाबाबत गत चार ते पाच वर्षांपासून उदासीनता आहे. प्रवेशाअभावी अनेक तंत्रनिकेतन शेवटच्या घटका मोजत आहेत. प्रवेश नगण्य असले तरी अनेक अभ्यासक्रम सुरू ठेवले आहेत. अशा अभ्यासक्रमांची चाचपणी करण्याचे आदेश मिळाले आहे. त्याअनुषंगाने सर्वच विभागांतील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सन २०१७ ते २०२० या वर्षात विविध अभ्यासक्रमांचे प्रवेश तपासले जात आहेत. ३० टक्क्यांपेक्षा प्रवेश कमी असल्यास शासकीय तंत्रनिकेतनच्या प्राचार्यांना हे अभ्यासक्रम बंद करण्याबाबतचा प्रस्ताव पाठविणे अनिवार्य करण्यात आले आहे. कदाचित असे प्रस्ताव पाठविण्यास कुचराई केल्यास संबंधित तंत्रनिकेतनच्या प्राचार्यांना कारवाईच्या सामोरे जावे लागेल, असे स्पष्ट निर्देश राज्याचे तंत्र शिक्षण सचिव सौरभ विजय यांनी आदेशाद्वारे दिले आहे.

अचलपूर तंत्रनिकेतनच्या प्रवेशाला कात्रीअचलपूर येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मॅकेनिकल अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता १२० वरून ६० एवढी करण्यात आली आहे. गत तीन वर्षांपासून या अभ्यासक्रमासाठी प्रवेश रोडावल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने निर्णय घेतला आहे. अमरावती येथील मार्डी मार्गालगतच्या नव विद्यानिकेतन बंद करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. 

मूर्तिजापूर तंत्रनिकेतनचा ६० जागांचा नव्याने प्रस्तावमूर्तिजापूर येथील शासकीय तंत्रनिकेतनला स्थापत्य अभियांत्रिकी प्रवेशासाठी ६० जागांचा नव्याने प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. स्थापत्य अभियांत्रिकी प्रवेशाला मागणी वाढत असल्याने हा प्रस्ताव अमरावती येथील तंत्रशिक्षण उपसंचालकांमार्फत राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. 

उच्च व तंत्रशिक्षण सचिवांच्या आदेशानुसार शासकीय तंत्रनिकेतनच्या प्राचार्यांना गत तीन वर्षांपासून ज्या अभ्यासक्रमात प्रवेश ३० टक्क्यांपेक्षा कमी आहे, अशा तंत्रनिकेतनचा अहवाल पाठविण्याबाबत कळविले आहे.   - एम. ए. अली  सहायक संचालक, तंत्र शिक्षण, अमरावती.राज्यात ४४ शासकीय तंत्रनिकेतन राज्यात अमरावती विभागात सहा, नागपूर विभागात सात, पुणे विभागात नऊ, औरंगाबाद विभागात १०, मुंबई विभागात सात, नाशिक विभागात पाच शासकीय तंत्रनिकेतन आहेत.

टॅग्स :iti collegeआयटीआय कॉलेज