शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

...तर ‘त्या’ डॉक्टरांना गोळ्या घालू, हंसराज अहिर यांचे वादग्रस्त वक्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 06:55 IST

चंद्रपूर : मी जनतेने निवडून दिलेला खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री आहे. मी येथे येणार हे माहिती असताना डॉक्टर कसे रजेवर जाऊ शकतात? त्यांचा लोकशाहीवर विश्वास नसेल तर त्यांनी खुशाल नक्षलवादी संघटनेत भरती व्हावे, आम्ही त्यांना गोळ्या घालू, असे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी सोमवारी येथे केले. त्यांच्या या ...

चंद्रपूर : मी जनतेने निवडून दिलेला खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री आहे. मी येथे येणार हे माहिती असताना डॉक्टर कसे रजेवर जाऊ शकतात? त्यांचा लोकशाहीवर विश्वास नसेल तर त्यांनी खुशाल नक्षलवादी संघटनेत भरती व्हावे, आम्ही त्यांना गोळ्या घालू, असे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी सोमवारी येथे केले. त्यांच्या या विधानाने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून येथील जिल्हा रुग्णालयात मेडिकल स्टोअर्सचे लोकार्पण अहिर यांच्या हस्ते झाले. केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते हा कार्यक्रम पूर्वनियोजित असताना जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाºयांनी दांडी मारली. शल्य चिकित्सक व अधिष्ठाता रजेवर गेल्याचे पाहून मंत्री अहिर यांचा पारा चढला. ते म्हणाले, सर्वसामान्य जनतेला स्वस्त दरात दररोज २४ तास या मेडिकल स्टोअर्सच्या माध्यमातून औषधांची उपलब्धता होईल. ही एक प्रकारे रुग्णसेवाच आहे. अशा लोकोपयोगी कार्याचा शुभारंभ होत असताना रुग्णालयाचे डॉक्टर्स कसे रजेवर जाऊ शकतात? त्यांचा लोकशाहीवर विश्वास नसेल तर त्यांनी खुशाल नक्षलवादी संघटनेत भरती व्हावे, आम्ही त्यांना गोळ्या घालू. अहिर यांचे हे वक्तव्य वृत्त वाहिन्यांवर दाखवले जाताच डॉक्टर वर्गातून तीव्र प्रतिक्रिया उमटली.

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिर