शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

...तर ‘त्या’ दोघीही बचावल्या असत्या

By admin | Updated: July 23, 2016 02:22 IST

सासू आणि पत्नीमध्ये सुरू असलेला वाद विकोपाला जात कोणीतरी यातून टोकाचे पाऊल उचलेल, याचा अंदाज लक्ष्मीकांत कणगुटकर यांना आधीच झाला

मनीषा म्हात्रे,

मुंबई- सासू आणि पत्नीमध्ये सुरू असलेला वाद विकोपाला जात कोणीतरी यातून टोकाचे पाऊल उचलेल, याचा अंदाज लक्ष्मीकांत कणगुटकर यांना आधीच झाला होता. याबाबत त्यांनी पोलिसांकडे पत्रव्यवहार केला. मात्र पोलिसांनी कौटुंबिक समस्या म्हणून याकडे दुर्लक्ष केले. जर याचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी आधीच समुपदेशन केले असते तर त्या दोघी बचावल्या असत्या. शिवाजी पार्क येथील बाल गोविंद दास रोडवरील जय हनुमान को-आॅपरेटिव्ह सोसायटीत राहणारे लक्ष्मीकांत कणगुटकर यांचा २००० रोजी अक्षतासोबत विवाह झाला. कांदिवली येथील कॅप्सूल कंपनीत ते कामाला आहेत. वर्षभर त्यांचा संसार सुखाचा गेला. मात्र त्यानंतर वयोवृद्ध आई उषा आणि पत्नीमध्ये खटके उडायला सुरुवात झाली. यामुळे दोघांमध्ये भांडणे होत. दोघी एकमेकांवर मारहाणीसाठी उतरत होत्या. दोघींचे भांडणे पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. याबाबत अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करीत पोलिसांनी त्यांना समज दिली. मात्र या दोघींच्या वाढत्या भांडणातून कोणीतरी चुकीचे पाऊल उचलेले याची भीती लक्ष्मीकांतला होती. त्यामुळे त्याने याबाबत शिवाजी पार्क पोलिसांना लेखी अर्ज दिला होता. दोघींच्या भांडणातून काही तरी चुकीचे होऊ शकते, यामुळे तुम्ही यावर काही तरी मार्ग काढा, अशी विनंती त्याने यामध्ये केली होती. मात्र कौटुंबिक वाद म्हणून पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले. अखेर विकोपाला गेलेल्या याच वादातून लक्ष्मीकांतला या दोघींनाही गमवावे लागले. सध्या दोन मुलांची जबाबदारी त्याच्या एकट्यावर आहे. या घटनेने लक्ष्मीकांत खचले आहेत. पुढे काय करायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.>फॅमिली मॅटरमध्ये समुपदेशन केले जातेया प्रकरणात सासू- सुनेने तक्रारी केल्या होत्या. त्याबाबत एनसी दाखल करून त्यांना समजावण्यात आले होते. त्यात कुठलेही कौटुंबिक वादविवाद आल्यास त्यामध्ये समुपदेशन करण्यात येते. हे प्रकरण जुने असल्याने या प्रकरणात समुपदेशन झाले होते की नाही, याबाबत माहिती नाही. - गंगाधर सोनावणे, वरिष्ठ निरीक्षक, शिवाजी पार्क पोलीस स्टेशन >नात्यात निर्माण झालेल्या दुराव्याला दोषी कोण?नवरा आईची बाजू घेऊन पत्नीला समजवू शकत नाही. आणि बायकोला समजावून ती ऐकत नाही. अशावेळी करणार काय, अशी परिस्थिती त्याच्यावर ओढवली होती. अशात त्याने मार्ग काढण्यासाठी पोलिसांची मदत घेतली, मात्र तीही उपयोगी न ठरल्याने याला दोषी कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.>घटनेदरम्यान चिमुकला होता घरात...गुरुवारी सकाळी सासू-सुनेचे भांडण सुरू असताना अक्षता यांचा लहान मुलगा राजदत्त (१४) घरातच होता. आतल्या खोलीत गाढ झोपेत असलेल्या राजदत्तला बाहेरच्या खोलीत सुरु असलेल्या भांडणाची चाहूल लागली नाही. जाग आल्यानंतर तो बाहेर आला तेव्हा बेडवर झोपलेल्या आईच्या तोंडातून फेस येत असल्याचे तर आजी खाली बेशुद्धावस्थेत पडल्याचे लक्षात आले. घाबरलेल्या या चिमुरड्याने थेट वडिलांशी संपर्क साधून माहिती दिली.