शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘रंगमंच’ नाट्य संस्थेवर पडदा पडणार

By admin | Updated: June 13, 2016 02:38 IST

मराठी नाट्यसृष्टीतल्या काही नाट्यसंस्था प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचल्या

राज चिंचणकर,

मुंबई- मराठी नाट्यसृष्टीतल्या काही नाट्यसंस्था प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचल्या, तर ज्या संस्थांच्या भाळी हे भाग्य आले नाही अशा काही संस्था मात्र विंगेत चाचपडत राहिल्या. यात स्वत:चा खिसा हलका करून रंगभूमीवर इमानेइतबारे निव्वळ घाम गाळलेल्या काही रंगकर्मींच्या पदरीही सुख पडले नाही. पण त्यांनी रंगभूमीची सेवा मात्र निष्ठेने केली आणि आजही करीत आहेत. पण या क्षेत्रात भवितव्य घडवणारा त्यांचा हा मार्ग आता अंधकारमय झाला आहे. अशाच एका काळोखी मार्गावर ज्येष्ठ रंगकर्मी उपेंद्र दाते यांची ‘रंगमंच (मुंबई)’ ही नाट्य संस्था आता वाट चालू लागली आहे. मराठी रंगभूमीवरची नाटके एकीकडे बाळसे धरू लागली असताना, या संस्थेला मात्र कुलूप लावण्याची वेळ आली आहे.मुंबईस्थित ‘रंगमंच’ या संस्थेने गेल्या ४४ वर्षांत तब्बल २५ गाजलेल्या नाटकांचे संपूर्ण महाराष्ट्रात शेकडो प्रयोग सादर केले. सध्या ‘नटसम्राट’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘समज गैरसमज’ अशा नाटकांचे प्रयोग ही संस्था रंगभूमीवर करीत आहे. पण या संस्थेच्या बाबतीतली ही शेवटची धुगधुगी म्हणता येईल. कारण या नाट्य संस्थेची आता अखेरची घंटा रंगमंचावरच्या विंगेत खणखणली आहे. या संस्थेचे सर्वेसर्वा उपेंद्र दाते यांनी ही संस्था बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.नाटक, चित्रपट व मालिकांमध्ये उपेंद्र दाते यांनी विविध भूमिका साकारल्या असल्या, तरी त्यांनी रंगभूमीलाच सर्वार्थाने वाहून घेतले आहे. रंगभूमीची अखंड सेवा करता यावी म्हणून त्यांनी ‘रंगमंच’ ही संस्था सुरू केली; परंतु अलीकडच्या काळात संस्था चालवण्यासाठी कर्ज आणि उसनवारीचा मार्ग त्यांना अवलंबावा लागला. रंगभूमीवर कितीही प्रेम असले तरी मर्यादित आर्थिक ताकद असलेल्या निर्मात्याला नाट्यसृष्टीत तग धरणे अवघड होऊन बसले आहे आणि त्याचा थेट फटका ‘रंगमंच’ला बसला आहे. याचा परिणाम म्हणजे या संस्थेची आता भैरवी आळवण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. >कर्जफेड करून कायमचे थांबणारकोणत्याही प्रकारचे बीज भांडवल नसतानाही मराठी नाट्यरसिक, सहकलाकार, तंत्रज्ञ व मित्रांच्या साथीने संस्थेने ४४ वर्षे वाटचाल केली. पण आज नाट्यसंहितेपेक्षा नाटकात कोण वलयांकित कलाकार आहेत, याला अधिक महत्त्व आले आहे, असे वाटते. संस्था बंद करायला मन राजी नसले, तरी हा कटू निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे. मात्र सर्व कर्जफेड करून कायमचे थांबण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.- उपेंद्र दाते, निर्माते, अभिनेते