शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

महिला धोरणाला अखेर मुहूर्त, महिलादिनी विधिमंडळात होणार सादर; महिला सुरक्षा, सन्मानावर भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 09:50 IST

महिला विशेष धोरण अमलात यावे, यासाठी नव्या शिंदे सरकारने पावले उचलली असून धोरणाचा नवीन मसुदा तयार करण्यात येत आहे. यात हिंसाचार रोखण्याबरोबरच लिंग समानतेचे धोरण राबवून पुरुषांच्या जोडीने महिलांनाही समान प्राधान्य मिळण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर देण्यात येत आहे.

मनोज मोघे -

मुंबई :  महिलांच्या सबलीकरणासाठी आवश्यक असणारे राज्याचे महिला धोरण ८ मार्च रोजी जागतिक महिलादिनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सादर केले जाणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारने पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘महिला धोरण’ सादर करण्यासाठी पावले उचलली आहेत. महिला व बालविकास विभागाकडून याची तयारी करण्यात येत असल्याची माहिती मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. महिलांना समाजात सन्मान मिळवून देणे तसेच  हिंसाचार रोखून त्यांना अधिकाधिक सुरक्षित वाटावे यासाठीची ठोस उपाययोजना या धोरणात केल्या जाणार आहेत. राज्याचे महिला विशेष धोरण २०१९ पासून रखडले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात याचा मसुदाही तयार झाला; मात्र हे धोरण रखडले.

पुरुषांबरोबर मिळणार स्थानमहिला विशेष धोरण अमलात यावे, यासाठी नव्या शिंदे सरकारने पावले उचलली असून धोरणाचा नवीन मसुदा तयार करण्यात येत आहे. यात हिंसाचार रोखण्याबरोबरच लिंग समानतेचे धोरण राबवून पुरुषांच्या जोडीने महिलांनाही समान प्राधान्य मिळण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर देण्यात येत आहे.

धोरणाच्या मसुद्यासाठी शिफारसी -- विधिमंडळ आणि न्यायपालिका यात महिलांचे प्रतिनिधित्व आणि सहभाग मजबूत करण्यासाठी यंत्रणा तयार करणे.- पंचायतराज संस्था आणि शहरी प्रशासन, वैधानिक समित्या, मिशन, आयोग, कॉर्पोरेशन, महामंडळे, सहकार क्षेत्र, प्रशासन आणि प्रशासकीय संस्थांत महिलांचा समावेश अनिवार्य करणे. - स्थायी समिती आणि इतर संविधानिक समित्यांमध्ये देखील महिलांसाठी जागा राखीव करणे.- धर्म, जात, सत्ता, प्रदेश यांमुळे स्त्रियांवर होणाऱ्या हिंसेला प्रतिबंध घालणे.- स्त्री-पुरुष जन्मदर समान ठेवण्यासाठी प्रभावी उपाय करणे.- महिलांसाठी स्वतंत्र सुरक्षित असे रात्र निवारे उभारणे.- ऑटो, टॅक्सी, जड वाहनांसाठीचे परवाने देताना महिलांना प्राधान्य देणे.- मालमत्ता खरेदीत महिलांना सामायिक मालकीचा हक्क देण्यास तरतूद.

उपसभापतींनीही केली शिफारसमहिला धोरण सन १९९४, २००२, २०१४ च्या महिला धोरणातील तरतुदी तसेच २०१९ च्या प्रस्तावित धोरणातील शिफारसी, २००१ साली पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी मांडलेल्या महिला धोरणातील तरतुदींचा समावेश नवीन महिला धोरणात करण्यात याव्यात, अशी शिफारस विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून करण्यात आली. या बैठकीत विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीने हा ठराव मंजूर करून महिला धोरण व त्यावरील चर्चेचा समावेश ८ मार्च रोजीच्या कामकाजात करण्यास मान्यता दिली.  

टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवनWomenमहिलाvidhan sabhaविधानसभा